एप्रिल २७
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
एप्रिल २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११७ वा किंवा लीप वर्षात ११८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
बारावे शतक
- ११२४ - डेव्हिड पहिला स्कॉटलंडच्या राजेपदी.
तेरावे शतक
- १२९६ - डनबारची लढाई - एडवर्ड पहिल्याने स्कॉटलंडचा पराभव केला.
सोळावे शतक
- १५०९ - पोप ज्युलियस दुसऱ्याने व्हेनिसला वाळीत टाकले.
- १५२१ - माक्टानची लढाई - पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.
- १५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.
सतरावे शतक
- १६६७ - अंध व हलाखीत दिवस काढणाऱ्या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटिश पाउंडला विकले.
अठरावे शतक
- १७७३ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटिश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
एकोणिसावे शतक
- १८१० - बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.
- १८१३ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.
- १८५४ - पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
- १८६१ - अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.
- १८७८ - कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.
विसावे शतक
- १९०८ - लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९०९ - तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसऱ्याची हकालपट्टी. त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.
- १९३० - वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून द इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३० हा वटहुकूम काढण्यात आला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.
- १९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
- १९६० - टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६१ - सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७४ - राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करण्यावी मागणी करीत अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
- १९८१ - झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.
- १९९२ - सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
- १९९४ - दक्षिण आफ्रिकेतील निवडणुकांमध्ये श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
एकविसावे शतक
- २००५ - एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.
- २०११ - अमेरिकेच्या दक्षिण भागातील सहा राज्यांत टोर्नॅडोंचा उद्रेक. ३०० पेक्षा ठार, कोट्यावधी अमेरिकन डॉलरचे नुकसान.
Remove ads
जन्म
- १७०१ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा
- १७९१ - सॅम्युअल मोर्स, मोर्स कोड व तारयंत्राचे जनक आणि चित्रकार.
- १८२२ - युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.
- १८८३ - भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर, मराठी नाटककार.
- १९०९ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९१२ - जोहरा सेहगल, भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि नृत्यदिग्दर्शिका.
- १९२० - डॉ. मणिभाई भीमभाई देसाई, महात्मा गांधींचे अनुयायी.
- १९२७ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
- १९७६ - फैसल सैफ, भारतीय पटकथालेखक, दिग्दर्शक
Remove ads
मृत्यू
- ६२९ - अर्देशर तिसरा, पर्शियाचा राजा.
- १५२१ - फर्डिनांड मॅगेलन, पोर्तुगीझ शोधक.
- १६०५ - पोप लिओ अकरावा.
- १८८२ - राल्फ वाल्डो इमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञ.
- १८९८ - शंकर बाळकृष्ण दीक्षित, ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक
- १९८० - विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील, महाराष्ट्रातील सहकारचळवळीचे नेते.
- १९८७ - सलीम अली, भारतीय पक्षीनिरीक्षक.
- १९८९ - कोनोसुके मात्सुशिता, पॅनासोनिक कंपनीचे स्थापक.
- २००२ - रुथ हॅंडलर, बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक.
- २००९ - फिरोज खान, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक.
- २०१७ - विनोद खन्ना, भारतीय अभिनेता
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - टोगो (१९६०), सियेरा लिओन(१९६१)
- मुक्ति दिन - दक्षिण आफ्रिका.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - (एप्रिल महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads