एप्रिल १७
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
एप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पहिले शतक
- ६९ - बेड्रियाकमची लढाई - व्हिटेलियस रोमन सम्राटपदी.
पंधरावे शतक
- १४९२ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
सोळावे शतक
- १५२१ - मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
एकोणिसावे शतक
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८९५ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
विसावे शतक
- १९३५ - सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरू केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
- १९४६ - सिरियाने फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळवले.
- १९५० - बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
- १९५२ - पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- १९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
- १९७० - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
- १९७१ - पाकिस्तानचे दोन तुकडे होउन बांगलादेशचा स्थापना झाली.
- १९७३ - कुरियर कंपनी फेडेक्सची सुरुवात.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.
- १९८६ - सिसिली आणि नेदरलॅंड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
एकविसावे शतक
- २००२ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.
Remove ads
जन्म
- ५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १४७८ - संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त.
- १७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.
- १७५६ - धीरन चिन्नामलाई, तमिळ क्रांतिकारी.
- १८९१ - यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार.
- १८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - सिरीमाओ बंदरनायके , श्रीलंकेच्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
- १९२७ - चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.
- १९५१ - बिंदू, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६१ - गीत सेठी, भारतीय बिलियर्ड्स खेळाडू.
- १९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
- १९७७ - दिनेश मोंगिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.
Remove ads
मृत्यू
- १०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १७९० - बेंजामिन फ्रॅंकलिन, अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी.
- १८८२ - जॉर्ज जेनिंग्स, फ्लश टॉयलेटचे शोधक.
- १८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - व्ही.एस. श्रीनिवासशास्त्री, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष.
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
- १९९० - दिनकर गंगाधर केळकर, राजा केळकर संग्रहालयाचे संचालक.
- १९९७ - बिजू पटनायक, ओरिसाचे मुख्यमंत्री, केंद्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री.
- १९९८ - विजय सिप्पी, हिंदी चित्रपट निर्माते.
- २००१ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक.
- २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
- २०११ - वि.आ. बुवा, मराठी विनोदी साहित्यिक.
- २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड लेखक.
- २०१२ - नित्यानंद महापात्रा, भारतीय पत्रकार आणि राजकारणी.
- २०१७ - एमो मोरेनो, ११७ वर्षांची इटालियन स्त्री.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक हेमोफिलिया दिवस
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads