Remove ads
भारतीय राजकारणी व भारतीय तत्त्वज्ञ,दुसरे राष्ट्रपती From Wikipedia, the free encyclopedia
सर्वपल्ली राधाकृष्णन (तथा सर्वपल्ली राधाकृष्णय्या; [२] ५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) हे एक भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि १९५२ ते १९६२ पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. ते १९४९ ते १९५२ पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. तसेच १९३९ ते १९४८ पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते.
राधाकृष्णन | |
२ रे भारतीय राष्ट्रपती | |
कार्यकाळ मे १३, इ.स. १९६२ – मे १३, इ.स. १९६७[१] | |
मागील | राजेंद्रप्रसाद |
---|---|
पुढील | झाकीर हुसेन |
कार्यकाळ १९५२ – १९६२ | |
जन्म | सप्टेंबर ५, इ.स. १८८८ तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक छोटे गाव, दक्षिण भारत |
मृत्यू | एप्रिल १७, इ.स. १९७५ |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | सिवाकामुअम्मा |
अपत्ये | पाच मुली व एक पुत्र, सर्वपल्ली गोपाल |
व्यवसाय | राजकारणी, तत्त्वज्ञ, प्राध्यापक |
धर्म | वेदान्त (हिंदू) |
राधाकृष्णन हे विसाव्या शतकातील तुलनात्मक धर्म आणि तत्त्वज्ञानाचे सर्वात प्रतिष्ठित विद्वानांपैकी एक होते. [३] [web १] ते १९२१ ते १९३२ या काळात कलकत्ता विद्यापीठातील किंग जॉर्ज पंचम मानसिक आणि नैतिक विज्ञान या विभागाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील पूर्व धर्माचे स्पॅल्डिंग चेअर आणि नैतिकता विभागाचे १९३६ ते १९५२ पर्यंत ते अध्यक्ष होते. [४]
राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते. त्यांनी या परंपरेची समकालीन आकलनासाठी पुनर्व्याख्या केली. [web १] ज्याला ते "अज्ञात पाश्चात्य टीका" म्हणायचे, त्याच्यापासून त्यांनी हिंदू धर्माचा बचाव केला. समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले. [५] भारत आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. [६]
राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९३१ मध्ये नाइटहूड, १९५४ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि १९६३ मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल केले गेले. हेल्पेज इंडिया या भारतातील वृद्ध वंचितांसाठी एक ना-नफा संस्था असलेल्या संस्थापकांपैकी ते एक होते. राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की "शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत." १९६२ पासून, त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. [web २]
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले. म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.
१९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.
कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.
ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दी मध्ये यश मिळवल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ - १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.
त्याचप्रमाणे ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ - १३ मे १९६७) होते.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.
चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.
ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.
एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.
संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
(१९५४) :' भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित.
राधाकृष्णन यांचे ग्रंथलेखन[७]
हयात तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथालय या ग्रंथमालेत डॉ. राधाकृष्णन यांच्यावर १९५२ साली THE PHILOSOPHY OF SARVEPALLI RADHAKRISHNAN Archived 2016-02-27 at the Wayback Machine. प्रकाशित झाला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.