Remove ads
भारतीय अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia
जोहरा मुमताज सेहगल (२७ एप्रिल १९१२ - १० जुलै २०१४) ह्या एक भारतीय अभिनेत्री, नर्तक आणि कोरिओग्राफर होत्या.[1] उदय शंकरच्या संचात नृत्यांगना म्हणून सेहगलने आपल्या करिअरची सुरुवात केली, आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. करिअरच्या ६० वर्षांहून अधिक काळात अभिनेत्री म्हणून त्या बॉलिवूडच्या असंख्य चित्रपटांमध्ये दिसल्या.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Zohra Sehgal | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | एप्रिल २७, इ.स. १९१२ सहारनपूर | ||
मृत्यू तारीख | जुलै १०, इ.स. २०१४ नवी दिल्ली | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण | |||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
भावंडे |
| ||
पुरस्कार |
| ||
|
त्यांनी ज्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये भाग घेतला त्यामध्ये नीचा नगर, अफसर (१९४६), भाजी ऑन द बीच (१९९२), दिल से .. (१९९८), द मिस्टिक मस्सुर (२००१), साया (२००३), सावरिया (२००७) आणि चीनी कम (२००७); आणि टीव्ही मालिका द ज्वेल इन द क्राउन (१९८४), तंदुरी नाईट्स (१९८५-१९८७) आणि अम्मा आणि फॅमिली (१९९६). [2] वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी २००२ मध्ये चलो इश्क लडाये या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली होती. भारतीय रंगमंचात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (आयपीटीए) आणि पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये १४ वर्षे काम केले.[3] त्यांनी बेंड इट लाईक बेकहॅम (२००२) सारख्या इंग्रजी भाषेतल्या चित्रपटातही काम केले आहे.
कामेश्वर सेहगल या हिंदूशी जोहरायांचे लग्न झाले. त्यांच्या पालकांकडून सुरुवातीला या लग्नास विरोध होता, परंतु शेवटी त्यांनी मान्यता दिली. १४ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी लग्न केले.[4]
जोहरा आणि कामेश्वर यांना दोन मुले होती; किरण सेगल आणि पवन सहगल. पवन सहगल विश्व स्वास्थ्य संस्था (डब्ल्यूएचओ) साठी काम करतात आणि किरण या नामांकित ओडिसी नर्तकी आहेत.[5] २०१२ मध्ये, किरण यांनी जोहराचे चरित्र "जोहरा सेहगलः फॅटी" असे प्रकाशीत केले.[6][5]
९ जुलै २०१४ रोजी न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना दक्षिण दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले.[7] १० जुलै २०१४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या १०२व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ११ जुलै रोजी दिल्लीच्या लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.[8][9]
त्यांना १९६३ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, १९९८ मध्ये पद्मश्री,[10] २००१ मध्ये कालिदास सन्मान मिळाले. २००४ मध्ये संगीत नाटक अकादमी, जी भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य कलेतील राष्ट्रीय अकादमी आहे, त्याच्या आजीवन कर्तृत्वासाठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप ह्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. २०१० मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.[11]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.