Remove ads
लेखक From Wikipedia, the free encyclopedia
भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (जन्म : चिपळूण, २७ एप्रिल १८८३; - २३ सप्टेंबर १९६४]) हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते.
वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवण व रत्नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले.
वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले, तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला.
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत.
बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंशती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत..
इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते.
नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच!
त्यांच्या नाटकांचे भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाले.
नाटक | लेखन वर्ष (इ.स.) | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
अ-पूर्व बंगाल | १९५३ | मराठी | लेखन |
उडती पाखरे | इ.स. | मराठी | लेखन |
करग्रहण | इ.स. ? | मराठी | लेखन |
करीन ती पूर्व | इ.स. १९२७ | मराठी | लेखन |
कुंजविहारी | इ.स. १९०४ | मराठी | लेखन |
कोरडी करामत | इ.स. | मराठी | लेखन |
चला लढाईवर | इ.स. | मराठी | लेखन |
जागती ज्योत | इ.स. ? | मराठी | लेखन |
जिवाशिवाची भेट | इ.स. १९५० | मराठी | लेखन |
तुरुंगाच्या दारात | इ.स. १९२३ | मराठी | लेखन |
त्याची घरवाली | इ.स. | मराठी | लेखन |
दौलतजादा | इ.स. | मराठी | लेखन |
संगीत द्वारकेचा राजा | मराठी | लेखन | |
धरणीधर | इ.स. | मराठी | लेखन |
न मागतां | इ.स. | मराठी | लेखन |
नवा खेळ | इ.स. | मराठी | लेखन |
नामा निराळा | इ.स. | मराठी | लेखन |
पतित पावन | इ.स. | मराठी | लेखन |
पापी पुण्य | इ.स. | मराठी | लेखन |
भूमिकन्या सीता | इ.स. १९५० | मराठी | लेखन |
माझ्या कलेसाठी | इ.स. | मराठी | लेखन |
मुक्त मरुता | इ.स. ? | मराठी | शेक्सपिअरच्या टेंपेस्टचा मराठी अनुवाद |
मैलाचा दगड | इ.स. ? | मराठी | लेखन |
लंकेची पार्वती | इ.स. | मराठी | लेखन |
लयाचा लय | इ.स. | मराठी | लेखन |
वरेरकरांच्या एकांकिका भाग १ ते ३ | इ.स. ? | मराठी | लेखन |
संगीत वरवर्णिनी अथवा सती सावित्री | इ.स. ? | मराठी | लेखन |
संगीत संजीवनी | इ.स. | मराठी | लेखन |
सत्तेचे गुलाम | इ.स. १९३२ | मराठी | लेखन |
सदा बंदिवान | इ.स. | मराठी | लेखन |
संन्याशाचा संसार | इ.स. १९२० | मराठी | लेखन |
समोरासमोर | इ.स. | मराठी | लेखन |
संसार | इ.स. | मराठी | लेखन |
सात लेखांतील एक | इ.स. | मराठी | लेखन |
सारस्वत | इ.स. १९४१ | मराठी | लेखन |
सिंगापूरहून | इ.स. | मराठी | लेखन |
सिंहगड | इ.स. | मराठी | लेखन |
सोन्याचा कळस | इ.स. १९३२ | मराठी | लेखन |
स्वयंसेवक (गद्यपद्यात्मक नाटक) | मराठी | लेखन | |
हाच मुलाचा बाप | इ.स. १९१७ | मराठी | लेखन |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.