इ.स. १८९८
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष From Wikipedia, the free encyclopedia
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १५ - क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरात अमेरिकन युद्धनौका यु.एस.एस. मेन वर स्फोट. २६० ठार. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू.
- एप्रिल २५ - अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
- मे १ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली.
- जून २१ - गुआम अमेरिकेचा प्रांत झाला.
- जून २२ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैनिक क्युबात उतरले.
- जुलै ३ - स्पॅनिश अमेरिकन युद्ध - अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.
- जुलै ७ - अमेरिकेने हवाई बळकावले.
- जुलै १८ - मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
- जुलै २५ - अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.
जन्म
- मार्च ११ - डोरोथी गिश, नाट्य व मुकचित्रपट अभिनेत्री.
- मे ३ - भालजी पेंढारकर (मराठी चित्रपट दिग्दर्शक).
- मे ३ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.
- जुलै ४ - गुलजारी लाल नंदा, भारतीय पंतप्रधान
- ऑगस्ट १३ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी.
मृत्यू
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.