लक्ष्मी
प्रमुख हिंदू देवी / From Wikipedia, the free encyclopedia
लक्ष्मी (/ˈlʌkʃmi/[1]; संस्कृत: लक्ष्मी, IAST: lakṣmī, इंग्रजी: Lakshmi (Laxmi)) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणांमधील समुद्रमंथन कथेनुसार ती समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आई तिरंगिनी यांची कन्या आहे.[2]
लक्ष्मी | |
राजा रवी वर्मा यांचे देवी लक्ष्मीचे चित्र समृद्धी, संपत्ती - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | लक्ष्मी |
संस्कृत | लक्ष्मीः |
कन्नड | ಲಕ್ಷ್ಮಿ |
तमिळ | லட்சுமி |
निवासस्थान | पृथ्वी वैकुंठ |
वाहन | कमळ , गरुड वैनतेय, घुबड |
शस्त्र | सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख |
वडील | प्रभु समुद्रदेव |
आई | तिरंगिनी |
पती | विष्णू नारायण |
अपत्ये | कामदेव |
अन्य नावे/ नामांतरे | विष्णूप्रिया,पद्मा (कल्की), सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, माधवी आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतसृजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया,मोहिनी |
या देवतेचे अवतार | सीता, पद्मा, धरणी, यशोधरा, पृथ्वी (माता), राधा, रुक्मिणी |
या अवताराची मुख्य देवता | पृथ्वी धरणी |
मंत्र | महादेव्यै च विद्महे। विष्णू पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात॥
ॐ महालक्ष्म्यै नम:॥ |
नामोल्लेख | श्रीमद भागवत, विष्णू पुराण श्रीसुक्त |
तीर्थक्षेत्रे | श्रीवीर वेंकटसत्यनारायण स्वामी मंदिर, तिरुपती बालाजी, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर |
विशेष माहिती | दिवाळी, लक्ष्मीपूजन, लक्ष्मीनारायण पूजा, कोजागरी / पौष पौर्णिमा |
ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण (विष्णू) सहित रामावतारात ती सीता बनली; कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली; दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.