सरस्वती
ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे ; ती या त्रिदेवीपैकी(सरस्वती लक्ष्मी आणि पा / From Wikipedia, the free encyclopedia
सरस्वती (संस्कृत: सरस्वती देवी, IAST: 'Sarasvatī') ही ज्ञान, बुद्धी, वाचा, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे.[1] ही आदिशक्तीकचे सत्वगुणप्रधान रूप आहे. सरस्वती मातेला संखीयरूपिणी असेही म्हटले जाते. गणित, कालमापन व ती ब्रह्मांडा मधील सर्व वाहकतत्वांची देवता आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे.[2] सरस्वती देवी ही हिंदू, बौद्ध व जैन ह्या तीनही धर्मांमध्ये ज्ञानदेवता म्हणून उपासली जाते. बौद्ध धर्मग्रंथांमध्ये देवीचे कित्येक उल्लेख आढळून येतात.[ संदर्भ हवा ]
हा लेख हिंदू देवी "सरस्वती" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सरस्वती (निःसंदिग्धीकरण).
याच नावाची वेदकालीन नदी यासाठी पाहा, सरस्वती नदी.
जलद तथ्य
बंद करा