![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/59/Brooklyn_Museum_-_A_Vision_of_Vishnu_%2528Vaikuntha_Darshana%2529.jpg/640px-Brooklyn_Museum_-_A_Vision_of_Vishnu_%2528Vaikuntha_Darshana%2529.jpg&w=640&q=50)
वैकुंठ
विष्णुलक्ष्मी चे निवास / From Wikipedia, the free encyclopedia
वैकुंठ वा वैकुंठ धाम (IAST: Vaikuṇṭha ,संस्कृत: वैकुण्ठ) वैकुंठलोक,विष्णूलोक, परम पदम, नित्य विभूति किंवा वैकुंठ सागर श्रीलक्ष्मीनारायणाचे वास्तविक निवासस्थान आहे. सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे, सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते. ज्या स्वर्गीय जगामध्ये पालनकर्ता श्रीविष्णू क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह निवास करतात.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/59/Brooklyn_Museum_-_A_Vision_of_Vishnu_%28Vaikuntha_Darshana%29.jpg/640px-Brooklyn_Museum_-_A_Vision_of_Vishnu_%28Vaikuntha_Darshana%29.jpg)
शांति, प्रेम, पुण्य, शुद्धता, संयम, दान, परिश्रम, धैर्य, दया आणि नम्रता व आनंदाचे स्थान आहे. पुण्याद्वारे माणसाला या जगात स्थान मिळते. जो येथे पोचतो तो गर्भात परत येणार नाही, कारण त्याला तारण प्राप्त झाले आहे. अध्यात्माच्या दृष्टीने वैकुंठलोक मन वा चेतनाची स्थान आहे.
मोक्ष, पुण्य करणारे लोक वैकुंठातच राहतात. एक शाश्वत दैवीय अविनाशी प्रकाशमान जग आहे. सर्व काही फळझाड, फुल, प्राणी, पक्षी, गाय, जलचर, समुद्र अनंत आहे.
रामानुजांच्या मते, परम पदम किंवा नित्य विभूती हे एक चिरंतन स्वर्गीय क्षेत्र आहे आणि ईश्वरीय अविनाशी जग आहे जे देवाचे निवासस्थान आहे, ते सर्व जगांपेक्षा उच्च स्थान आहे आणि त्यापलीकडे काहीही नाही.[1] जय-विजय हे विष्णूंच्या निवासस्थानाचा प्रवेशद्वराचे संरक्षक द्वारपाल आहे.[2]