महाराष्ट्रामधील जिल्हे

महाराष्ट्र From Wikipedia, the free encyclopedia

महाराष्ट्रामधील जिल्हे
Remove ads

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य असून या राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[] राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा हा सर्वात मोठा तर मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत.

Thumb
महाराष्ट्रातील जिल्हे विभागानुसार
Remove ads

इतिहास

  • १८१८ मध्ये बॉम्बे स्टेट मध्ये महाराष्ट्रातील खान्देश, बेळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्‍नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे ११ जिल्हे होते.
  • १९०६ मध्ये खान्देश जिल्ह्याचे विभाजन करून धुळे व जळगाव हे दोन जिल्हे बनविण्यात आले.
  • राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार कच्छ, बडोदा ही संस्थाने व सौराष्ट्र राज्य हा गुजराती भाषिक प्रदेश, तसेच हैदराबाद संस्थानमध्य प्रांत आणि वऱ्हाड ह्या भागातील मराठी भाषिक प्रदेश पूर्वीच्या मुंबई राज्याला जोडून द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली होती. १ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
  1. मुंबई शहर, (१९९५ मध्ये राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यानंतर बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले.)[]

२) मुंबई उपनगर, ३) ठाणे, ४) पालघर, ५) रायगड, ६) रत्‍नागिरी, ७) सिंधुदुर्ग, ८) सांगली, ९) सातारा, १०) कोल्हापूर, ११) सोलापूर, १२) पुणे, १३) छत्रपती संभाजीनगर, १४) धाराशिव, १५) जालना, १६) नांदेड, १७) परभणी, १८) बीड, १९) लातूर, २०) हिंगोली, २१) नाशिक, २२) नंदुरबार, २३) धुळे, २४) जळगाव, २५) अहिल्यानगर, २६) नागपूर, २७) अमरावती,

  1. चंद्रपूर, (सन १९६४मध्ये चांदा शहराचे नाव बदलून "चंद्रपूर" करण्यात आले.)[]

२९) अकोला, ३०) वर्धा, ३१) बुलढाणा, ३२) यवतमाळ, ३३) भंडारा, ३४) गोंदिया, ३५) वाशिम, ३६) गडचिरोली ही ३६ जिल्हे आहेत.[][]

  • १ जुलै १९९८ रोजी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार व अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या दोन नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[११]
  • १ मे १९९९ रोजी नारायण राणे मुख्यमंत्री असताना परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली व भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[१२]
  • १ ऑगस्ट २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[१३] पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे झाले.
Remove ads

प्रदेश आणि विभाग

भौगोलिक प्रदेश

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेशांमध्ये विभाजन केले जाते.

विभाग

महाराष्ट्र राज्याची सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.[] विभागानुसार जिल्ह्यांची यादी खाली दिली आहे.

अधिक माहिती क्र., विभागाचे नाव ...
Remove ads

जिल्ह्यांची यादी

खालील तक्त्यामध्ये सर्व ३६ जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांची लोकसंख्या व संबंधीत माहिती दिली आहे. लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे.[१४][१५][१६] साक्षरता दर हा ० ते ६ या वयोगटातील लहान मुलांना वगळून आहे. म्हणजेच, साक्षरता दर = एकूण साक्षर / (एकूण लोकसंख्या - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या)

अधिक माहिती क्र., नाव ...
Remove ads

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading content...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads