भारतातील एक राजकीय पक्ष From Wikipedia, the free encyclopedia
शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.[2] मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. १७ फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे.
शिवसेना | |
---|---|
पक्षाध्यक्ष | एकनाथ शिंदे |
स्थापना | १९ जून १९६६ |
मुख्यालय | शिवसेना जनसंपर्क कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र |
विभाजन | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
युती | भारतीय जनता पक्ष |
लोकसभेमधील जागा | १९/५४५[1] |
राजकीय तत्त्वे | राजकारण, सत्ता |
प्रकाशने | सामना, मार्मिक, दोपहर का सामना |
संकेतस्थळ | शिवसेना.ऑर्ग |
शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद होतं. मात्र २१ जून २०२२ रोजी शिवसेनेचे नेते 'एकनाथ शिंदे' यांनी पक्षातील ४० व अपक्ष आमदारांसोबत बंड केले व २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजप असे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे व उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहे.
"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.