वाशिम
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर. From Wikipedia, the free encyclopedia
वाशिम हे वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या ६२,८६३ आहे.

हा लेख वाशिम शहराविषयी आहे. वाशिम जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
इतिहास
वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे. यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन.) वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशिमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.
वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.[१]
त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ १९९८ मध्ये पुन्हा वाशिम हा जिल्हा घोषित करण्यात आला. [२]
सेवालाल मंदिर , जगदंबा मंदिर ,(बंजारा समाजाचे संत व देवी आहे)
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.