From Wikipedia, the free encyclopedia
हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[3] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[4]
मॅककरान आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: LAS – आप्रविको: KLAS – एफएए स्थळसंकेत: LAS – WMO: 72386 | |||
नकाशाs | |||
एफएए रेखाचित्र | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | क्लार्क काउंटी | ||
प्रचालक | क्लार्क काउंटी हवाई वाहतूक विभाग | ||
कोण्या शहरास सेवा | लास व्हेगस, नेव्हाडा,हेंडरसन, नेव्हाडा, नॉर्थ लास व्हेगस, नेव्हाडा | ||
स्थळ | पॅरेडाइझ, नेव्हाडा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,१८१ फू / ६६५ मी | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
1L/19R | ८,९८८ | २,७४० | कॉंक्रीट |
1R/19L | ९,७७१ | २,९७८ | कॉंक्रीट |
7L/25R | १४,५१२ | ४,४२३ | आस्फाल्ट |
7R/25L | १०,५२५ | ३,२०८ | कॉंक्रीट |
सांख्यिकी (२०१४) | |||
उड्डाणावतरणे | ५,२७,७३९ | ||
प्रवासी | ४,२८,६९,५१७ | ||
येथे स्थित विमाने | १३० | ||
स्रोत: एसीआ.[1] आणि एफएए[2] |
हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[5]
मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[1] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[6]
ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[18][19] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[20]
विमानकंपनी | गंतव्यस्थान |
---|---|
अलोहा एर कार्गो | होनोलुलु |
फेडेक्स एक्सप्रेस | मेम्फिस, ओकलंड, रीनो-टाहो |
यूपीएस एअरलाइन्स | लुईव्हिल, ऑन्टारियो |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.