साउथ बेंड आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
साउथ बेंड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SBN, आप्रविको: KSBN, एफ.ए.ए. स्थळसूचक: SBN) अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील साउथ बेंड शहरात असलेला विमानतळ आहे. याचे जुने नाव बेंडिक्स फील्ड आहे.
येथून अमेरिकेतील निवडक शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नाही. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एरलाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा वापर करतात.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.