Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
बोईंग ७३७ | |
---|---|
एर बर्लिनचे बोईंग ७३७-८०० | |
प्रकार | मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दोन इंजिनांचे जेट विमान |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | बोईंग |
पहिले उड्डाण | ९ एप्रिल, इ.स. १९६७ |
समावेश | १० फेब्रुवारी, इ.स. १९६८ (लुफ्तांसा) |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | साउथवेस्ट एअरलाइन्स, रायनएर, वेस्टजेट एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, इ. |
उत्पादन काळ | १९६६ - सद्य |
उत्पादित संख्या | ८,७२५ (सप्टेंबर २०१५) |
प्रति एककी किंमत | ३ कोटी २० लाख (-१००), ५ कोटी ९४ लाख (-६००), ७ कोटी ८३ लाख (-७००), ९ कोटी ३३ लाख (-८००), ९ कोटी ९० लाख (-९००ईआर) |
उपप्रकार | बोईंग टी-४३ |
नियमितपणे उत्पादित प्रवासी विमानांत बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे.
या विमानाचे अनेक उपप्रकार आहेत -
यांपैकी -७००, -८०० आणि -९००ईआर उपप्रकार सध्या उत्पादनात आहेत तर ७३७ मॅक्स उपप्रकार २०१७पासून तयार होतात.
या विमानाचा पहिला उपप्रकार -१०० फेब्रुवारी १९६८ पासून सेवारत आहे. लुफ्तांसाने या प्रकारचे विमान सगळ्यात आधी आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते.[१][२]
त्यानंतर एक वर्षाने -२०० उपप्रकार सेवेत आला. १९८० च्या दशकात बोईंगने -३००, -४०० आणि -५०० उपप्रकार बाजारात आणले. -५०० पर्यंतचे हे उपप्रकार ७३७ क्लासिक नावानेही ओळखले जातात. १९९० च्या दशकात बोईंगने -६००, -७००, -८०० आणि -९००ईआर हे उपप्रकार आणले. यांना ७३७ नेक्स्ट जनरेशन नावानेही ओळखतात.
२०१७ च्या सुमारास बोईंगने मॅक्स नावाने उपप्रकारांचा गट बाजारात आणला. या प्रकारच्या विमानांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या व त्यांमुळे दोन विमाने कोसळून शेकडो प्रवासी ठार झाले. या त्रुटी दूर केल्यानंतर या विमानाला परत प्रवासी उड्डाणे करण्यास काही देशांमध्ये परवानगी मिळाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.