Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
वेस्टजेट ही कॅनडा देशातील एक प्रवासी विमानवाहतूक कंपनी आहे. कॅनडातील प्रमुख एरलाइन्सच्या स्पर्धेत प्रवाशांना किफायतशीररीत्या कमी खर्चात प्रवास करता यावा म्हणून या एरलाइनचा उदय झाला.[१] ही एरलाइन देशात आणि देशाबाहेर १०० ठिकाणी विमान सेवा देते. आजच्या घडीला वेस्टजेट एर कॅनडाखालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[२] वेस्टजेटकडे सध्या ४२५ विमाने आहेत आणि ती प्रत्येक दिवशी ४५००० पेक्षाही जादा प्रवासी वाहतूक करतात. सन २०१३ मध्ये या कंपनीने १८५ लाख प्रवाशांची ने-आण केली. आणि उत्तर अमेरिकेतील ९ क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी ठरली. या कंपनीत १०००० कर्मचारी काम करतात.[३] यांची संघटना नाही आणि वेस्टजेटचा इतर कोणत्याही एरलाइन्स बरोबर करार नाही.
| ||||
स्थापना | २९ फेब्रुवारी १९६६ | |||
---|---|---|---|---|
हब |
कॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कॅल्गारी) टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोराँटो) व्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हँकूव्हर) | |||
मुख्य शहरे |
एडमंटन विनिपेग लंडन गॅटविक विमानतळ | |||
विमान संख्या | ११७ | |||
गंतव्यस्थाने | ९१ | |||
मुख्यालय | कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा | |||
संकेतस्थळ | http://westjet.com/ |
वेस्टजेट या विमान कंपनीची स्थापना क्लाइव्ह बेद्दोए, डेव्हिड नीलेमान, मार्क हिल, टिम मॉर्गन,आणि डोनाल्ड बेल यांनी दिनांक २९-२-१९९६ रोजी केली. अमेरिकेचे साऊथ वेस्ट एरलाइन्स आणि मॉरिस एर यांचे कमी खर्चाच्या विमान सेवेचे मंत्र आत्मसात करून व मार्गदर्शक बांबी नजरेसमोर ठेवून कमी खर्चाची वेस्टजेट विमान सेवा चालू केली.[४] यांचे सुरुवातीचे विमान मार्ग पश्चिम कॅनडातील होते म्हणून त्याला वेस्टजेट हे नाव दिलेले आहे. वरील दिनांकास बोइंग ७३७-२०० ही तीन विमाने व २२५ कर्मचारी वापरून वेस्टजेट कॅलगरी, एडमाॅन्टन, केलोवना, व्हँकूव्हर आणि विंनिंग येथे वेस्टजेटची प्रथम सेवा सुरू झाली.[५] त्याच वर्षी रेगिना, सासकटून आणि व्हिक्टोरिया येथे विमान सेवा देऊन आपला विस्तार वाढविला.
वेस्टजेट एंकोरही वेस्टजेटची सहकारी प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. २४ जून, २०१३ पासून ही कंपनी बाँबार्डिये क्यू४०० प्रकारची विमाने वापरून विमानसेवा पुरवते.[६]
वेस्टजेट आणि वेस्टजेट आंकोर सध्या उत्तर आणि मध्य अमेरिका, कॅरिबियन, युरोप, कॅनडातील ३६ शहरे, आणि युनायटेड स्टेट्स मधील २१ शहरे अशा २० देशात १०० ठिकाणी विमान सेवा देतात. वेस्टजेटचे मुख्य आणि सर्वात मोठे ठाणे टोरोंटो पियरसन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुख्यतः तेथून पूर्व कॅनडा आणि कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच पश्चिम कॅनडाही जोडलेले आहे. वेस्टजेट ११ कॅनडातील शहरातून ओरलँडो आणि १२ शहरांतून लास व्हेगसला मोसमी थेट विमानसेवा पुरवते.
वेस्टजेट कॅरिबियन देशांतील २० शहरे आणि मेक्सिको मधील ७ शहरांना सेवा पुरवते. त्यांतील काही मोसमी आहेत. वेस्टजेटने आपली नवीन बोईंग-७६७ विमाने वापरून लंडन गॅटविकला थेट सेवा पुरविण्याचे घोषणा जुलै २०१५ मध्ये केली.[७]
जुलै २००८ मध्ये वेस्टजेटने साऊथवेस्ट एरलाइन्स बरोबर करार केल्याची घोषणा केली. एप्रिल २०१० मध्ये त्यांनी हा करार रद्दबातल झाल्याची घोषणा केली आणि ऑक्टोबर २०१० मध्ये अमेरिकन एरलाइन्स बरोबर भागीदारी केली.
वेस्ट जेटचा खालील एर लाइन्स बरोबर कायदेशीर भागीदारी करार केलेला आहे.[८]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.