Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
साउथवेस्ट एरलाइन्स (इंग्लिश: Southwest Airlines) ही अमेरिका देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. कमी दरात प्रवासी विमानसेवा पुरवणारी साउथवेस्ट ही जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. अमेरिकेच्या एकूण ९१ शहरांमध्ये रोज ३,४०० सेवा पुरवणारी साउथवेस्ट देशांतर्गत प्रवासी संख्येत अमेरिकेमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.
| ||||
स्थापना | १६ मार्च १९६७ | |||
---|---|---|---|---|
मुख्य शहरे |
बॉल्टिमोर-वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ शिकागो मिडवे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅलस लव्ह फील्ड डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ लास व्हेगास आंतरराष्ट्रीय विमानतळ नॅशव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ ओरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळ फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ सॅन डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ टँपा आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्युस्टन हॉबी विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | रॅपिड रिवॉर्ड्स | |||
विमान संख्या | ६४६ | |||
ब्रीदवाक्य | If it matters to you, it matters to us | |||
मुख्यालय | डॅलस, टेक्सास |
साउथवेस्ट एरलाइन्सने कटाक्षाने आपला ताफा एकाच प्रकारच्या विमानांचा ठेवलेला आहे. आपली सगळी विमाने बोईंग ७३७ प्रकारची[1][2] असल्याने त्यांची निगा राखणे, देखभाल करणे तसेच आयोजन करणे सोपे जाते.
प्रकार | संख्या | मागण्या | ऑप्शन | प्रवासी | नोंदी |
---|---|---|---|---|---|
बोईंग ७३७-३०० | १२७ | — | — | १३७ १४३ |
२०२०पर्यंत निवृत्त होतील[3] |
बोईंग ७३७-५०० | १२ | — | — | १२२ | २०१६पर्यंत निवृत्त होतील[4] |
बोईंग ७३७-७०० | ४४७ | २० | ३७ | १४३ | या मागण्या -८००मध्ये परिवर्तित करता येतील |
बोईंग ७३७-८०० | ९५ | २६ | — | १७५ | |
बोईंग ७३७ मॅक्स ७ | — | ३० | — | २०१९मध्ये ताफ्यात दाखल होतील[5] | |
बोईंग ७३७ मॅक्स ८ | — | १७० | १९१ | २०१७मध्ये ताफ्यात दाखल होतील[6] | |
एकूण | ६८१ | २४८ | २२८ |
साउथवेस्ट एरलाइन्स कडे जगात सर्वाधिक बोईंग ७३७ प्रकारची विमाने आहेत. पैकी -३००, -५०० आणि -७०० उपप्रकारांची विमाने सर्वप्रथम साउथवेस्टच्या ताफ्यात दाखल झाली होती तसेच -मॅक्स ७ आणि -मॅक्स ८ उपप्रकारांची विमानेही सर्वप्रथम साउथवेस्टकडेच येतील.[7] २०१२मध्ये एरट्रान एरवेझ खरेदी केल्यावर त्या ताफ्यातील ७३७ प्रकारची विमाने साउथवेस्टच्या ताफ्यात शामिल करण्यात आली तर बोईंग ७१७ प्रकारची विमाने हळूहळू डेल्टा एर लाइन्सला विकण्यात आली.[8][9]
साउथवेस्टच्या ताफ्यातील -३०० विमानांमध्ये आधुनिक फ्लाइट डेक आणि विंगटिप लावण्यात येतात. याने ही विमाने -७०० उपप्रकारांच्या अगदी सारखी होउन देखभालीचा खर्च कमी होते. याशिवाय साउथवेस्टने अंगिकारू पाहिलेल्या जीपीएस प्रणालीशी ही विमाने सुसंगत होण्यासही मदत होते.[10][11] साउथवेस्टने -८०० उपप्रकाराची विमाने ११ एप्रिल, २०१२ रोजी दाखल केली. यात इतर विमानांपेक्षा ३८ किंवा अधिक जादा प्रवासी बसू शकतात.[12] ही विमाने ईटॉप्स प्रमाणित असून त्यात बोईंक स्काय इंटिरियर प्रकारची अंतर्रचना आहे.[13]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.