पुसद तालुका
पुसद From Wikipedia, the free encyclopedia
पुसद From Wikipedia, the free encyclopedia
पुसद हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे व विदर्भातील मोठ्या शहरापैकी एक शहर आहे व तालुक्याचे ठिकाण आहे. या शहराचे प्राचीन नाव पुष्पावंती नगरी असे होते. शहराचा प्रशासकीय कारभार येथील नगर पालिका पाहते.
?पुसद महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: पुष्पावंती नगरी | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
हवामान तापमान • उन्हाळा • हिवाळा |
• ४० °C (१०४ °F) • २० °C (६८ °F) |
मोठे शहर | पुसद शहर (पश्चिम) |
जवळचे शहर | वाशिम, दिग्रस, उमरखेड, यवतमाळ |
विभाग | अमरावती |
जिल्हा | यवतमाळ |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
३,४१,१८६ (2011) ९४० ♂/♀ ८०.१६ % • ७६.५१ % • ६१.८५ % |
भाषा | बंजारा(लमानी), मराठी |
तहसील | पुसद |
पंचायत समिती | पुसद |
कोड • पिन कोड |
• ४४५२०४ |
पुस ही नदी पुसद शहरातून वाहते. लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते. स्वातंत्र्यपूूर्व काळात भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद येथे झाला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे पुसदचेच होते. पुसदला वेगळा जिल्हा म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. पुसद येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुसद या शहरातून सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.पुसद हा महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारं एक शहर आहे. पुसद हा यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखते जाते. पुसद हा यवतमाळ जिल्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पुसदकर मागच्या 23 वर्षपासून रेल्वे मागत आहे. 2016ला रेल्वेची मंजूरी पत्रक आले आहे. तसेच पुसद व आजू बाजूच्या परिसरात एकूण १० पेट्रोल पंप आहेत आणि देव दर्शनासाठी धनकेश्र्वर, हर्शी व करला श्री संत दूधधारी महाराज संजीवन समाधी बोरी (खु) या सारखे प्राचीन देवस्थान पाहायला मिळतात. पुसद इथे सर्व महाविद्यालय आहे.पुसद इथे सर्वात जास्त बंजारा समाज राहते.इथे कोटल्या पण निवडणूक मध्ये नाईक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. सध्या इथे इंद्रनील मनोहर नाईक शासन करत आहे (आमदार २०१९ रा.काँग्रेस सरकार).
पुसद हे शहर डोंगराळ भागात येते. हे शहर डोंगरांनी वेढलेले असून याच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. पुसद येथे येण्यासाठी किंवा येथून जाण्यासाठी घाट ओलांडावा लागतो.
Seamless Wikipedia browsing. On steroids.