तापमान

From Wikipedia, the free encyclopedia

(इंग्लिश भाषा:Temperature. वातावरणातील उष्णता मोजण्याचे परिमाण.)

पाण्याचा गोठनबिंदू सें. आहे.तापमापी येथे उणे १७ तपमान दर्शवित आहे.

तापमान हे पदार्थातील कणांची (अणू वा रेणू) सरासरी ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. पदार्थ किती थंड वा गरम आहे हे मोजण्यासाठी तापमान वापरतात. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा उपयोग करतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सियस, अंश फॅरेनहाइट, आणि अंश केल्विन ही एकके वापरतात.

सैधांतिक किमान तापमानाला परम शून्य म्हणतात. ह्या तापमानाला पदार्थातील कणांची गती शून्य मानली जाते. परम शून्य हे केल्विन मापन पद्धतीत ०°Κ, सेल्सियस मापन पद्धतीत- २७३.१५ °С आणि फॅरेनहाइट मापन पद्धतीत -४५९.६७°F संबोधिले जाते.

भौतिक, रसायन, वैद्यक, भूगर्भ, जीव व हवामान इत्यादी शास्त्रांसह दैनंदिन व्यवहारात तापमानाचे खूप महत्त्व आहे.

तापमान ही सध्य जगत खूप चार्व्चेच विषय असून ही एक घाम्बीर समस्या झाही आहे. तरी आपण तापमान आटोक्यात आणण्याचा पर्यंत करावा नाहील्तर जगाचा विनाश्गा हा आतलं आहे.

तापमानाचे परिणाम

  • पदार्थाचे भौतिक गुणधर्म बदलतात उदा.अवस्था [स्थायु,द्रव,वायु],घनता,विद्युतवाहकता,विद्राव्यता
  • रासायनिक क्रियांची गति
  • ध्वनीची गति
  • पदार्थाच्या पृष्ठभागावरून होत असलेल्या औष्णिक उत्सर्जनाची गति व प्रमाण
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.