भारताची प्रमुख लिपी From Wikipedia, the free encyclopedia
देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. मराठी, भोजपुरी, कोकणी, संस्कृत, पाली, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, मैथिली, रोमानी, हिंदी ,बंजारा भाषा इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.[1]
मराठी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, काश्मिरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानीसारख्या या व इतर काही भारतीय मुळे असलेल्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चिनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे. मराठी देवनागरी लिपीला बालबोध लिपी म्हणतात. (बालबोध नसलेली दुसरी मराठी लिपी म्हणजे मोडी लिपी.)
या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.
भारत तसेच आशिया मधील अनेक लिप्यांचे (उर्दू सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.
आपले विचार शब्दांच्या किंवा कोणत्याही माध्यमातुन व्यक्त करण्याचे कार्य भाषा करते. तत्त्व: कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ ओ औ अं अः ॲ ॲा
ा ि ी ु ू ृ ॄ ॢ ॣ े ै ो ौ ं ः ॅ ॉ ॅं ् र्
० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
देवनागरी युनिकोड | 0 | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | A | B | C | D | E | F |
U+090x | ऀ | ँ | ं | ः | ऄ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ऋ | ऌ | ऍ | ऎ | ए |
U+091x | ऐ | ऑ | ऒ | ओ | औ | क | ख | ग | घ | ङ | ङ | च | छ | ज | झ | ञ |
U+092x | ट | ठ | ड | ढ | ण | त | थ | द | न | ऩ | प | फ | ब | भ | म | य |
U+093x | र | ऱ | ल | ळ | ऴ | व | श | ष | स | ह | ऻ | ऽ | ा | ि | ी | ु |
U+094x | ू | ृ | ॄ | ॅ | ॆ | े | ै | ॉ | ॊ | ो | ौ | ् | ॎ | ॏ | ॐ | ॒ |
U+095x | ॓ | ॔ | ॕ | ॖ | ॗ | क़ | ॖ | ॗ | क़ | ख़ | ग़ | ज़ | ड़ | ढ़ | फ़ | य़ |
U+096x | ॠ | ॡ | ॢ | ॣ | । | ॥ | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
U+097x | ॰ | ॱ | ॲ | ॳ | ॴ | ॵ | ॶ | ॷ | ॸ | ॹ | ॺ | ॻ | ॼ | ॽ | ॾ | ॿ |
Windows 10 या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सर्व भारतीय भाषांसाठी पहिल्यापासून कळफलक उपलब्ध असतो. त्याचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे.
१. सर्वप्रथम संगणकावर Control Panel मध्ये जाऊन Region यावर टिकटिकवतात.
२. Regionची एक चौकट उघडेल. त्या चौकटीतील Fromat या मथळ्याखालील Language Preferences या दुव्यावर टिकटिकवतात.
३. Language Preferencesच्या चौकटीमध्ये Preferred Languageच्या अंर्तगत असणाऱ्या Add a preferred languageच्या अधिक+ या चिन्हावर टिचकी मारतात..
४. नवीन उघडलेल्या चौकटीतील शोधा या चौकटीत हवी असणारी देवनागरी भाषा (उदा. संस्कृत,मराठी, कोकणी, हिंदी) शोधतात व त्यावर टिकटिकवून Next या बटनावर टिकटिकवतात.
५. त्यानंतर शोधलेली भाषा Install या बटनावर टिकटिकवून आपल्या संगणकावर उतरावून घेता येते..
६. संगणकावर Alt+⇧ Shift कळ दाबून हवी असलेली भाषा निवडता येते, किंवा संगणकाच्या स्क्रीनवर उजव्या बाजूस खाली किंवा वर असणाऱ्या भाषेच्या चिन्हावर टिकटिकवून हवी असलेली भाषा निवडता येते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.