From Wikipedia, the free encyclopedia
गुजराती (मराठीत गुजराती), ही भारत देशाच्या गुजरात राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून जगात २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे ६.६ कोटी लोक गुजरातीभाषक आहेत.
गुजराती | |
---|---|
ગુજરાતી | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | गुजरात |
लोकसंख्या | ६.६ कोटी |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | गुजराती वर्णमाला |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
ad भारत |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | gu |
ISO ६३९-२ | guj |
ISO ६३९-३ | guj[मृत दुवा] |
गुजरातप्रमाणेच मुंबईमध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. भारताबाहेर पूर्व आफ्रिका, अमेरिका व इंग्लंडमध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत गुजराती भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जात असे. पुढे ती सध्या वापरली जाते त्या महाजन नावाच्या लिपीत लिहिली जाऊ लागली. (संदर्भ : [permanent dead link]) गुजराती संस्कृत भाषेतून विकसित झालेली आधुनिक इंडो- आर्यन भाषा आहे . सामान्यतः तीन ऐतिहासिक कालखंडात टप्प्याटप्प्याने इंडो -आर्यन भाषांचे वर्गीकरण केलेले आहे:
(१) प्राचीन इंडो -आर्यन भाषा ( वैदिक आणि शास्त्रीय संस्कृत )
(२) मध्ययुगीन इंडो आर्यन भाषा ( प्राकृत आणि तिचे अपभ्रंश )
(३) अर्वाचीन इंडो आर्यन भाषा ( आधुनिक भारतीय भाषा जसे मराठी , हिंदी ,इत्यादी)
या प्रवाहातून, कालखंडातून गुजराती भाषेचा विकास झाला.
हिला "गुजराती भाखा" किंवा "गुर्जर अपभ्रंश" म्हणतात. आधुनिक गुजराती आणि राजस्थानी भाषेचे पूर्वज आणि ह्या भाषा गुर्जर लोक (ज्या लोकांनी वेळोवेळी पंजाब, राजस्थान, मध्य भारत आणि गुजरातच्या विविध भागात वास्तव्य केले आणि शासन केले.) बोलत असत. १२व्या शतकात गुजराती साहित्यिक भाषा म्हणून वापरली गेली आहे . पण त्या वेळी त्या भाषेचे तीन उपभेद होते. १३व्या शतकात गुजराती भाषेचे प्रमाणित स्वरूप विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वीची भाषा जुनी गुजराती म्हणून ओळखली जाते. काही विद्वान या जुन्या भाषेचे वर्णन जुनी पाश्चात्त्य राजस्थानी भाषा असे करतात. त्या वेळची गुजराती आणि राजस्थानी कदाचित भिन्न नसावी.
नरसी मेहता (१४१४-१४८०) यांना आधुनिक गुजराती कवितांचे जनक असे म्हणतात .
गुजराती भाषेवर मराठी, हिंदी व फारशी भाषांचा चांगलाच प्रभाव जाणवतो. सौराष्ट्रात, कच्छमध्ये, आणि उत्तरेकडील मेहसाणा, बनासकांठा आदी विभागांत बोलली जाणारी गुजराती अहमदाबाद-बडोदा येथील गुजरातीपेक्षा काहीशी वेगळी असते. कच्छी बोली तर सिंधीला जवळची आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.