इंडो-युरोपीय भाषासमूह
From Wikipedia, the free encyclopedia
इंडो-युरोपीय हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. युरोप, दक्षिण आशिया, इराण, अनातोलिया इत्यादी भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बव्हंशी प्रमुख भाषा आणि बोली ह्याच कुळातील आहेत. सध्या या कुळातील ४४५ भाषा अस्तित्वात आहेत.

अल्पसंख्य इंडो-युरोपीय भाषिक लोक असणारे देश
सध्या जगात ३ अब्ज इंडो-युरोपीय भाषिक लोक आहेत. सध्या जगातील सुमारे ४६% लोकांची इंडो-युरोपीयन भाषाकुळातील भाषा ही मातृभाषा किंवा पहिली भाषा आहे. युरोपमधील बहुतांश महत्त्वाच्या भाषा याच भाषाकुळातील आहेत. प्राचीन अनोतोलीया (सध्याचे तुर्की) तरीम खोरे (सध्याचे उत्तर-पश्चिमेकडील चीन) आणि प्रामुख्याने मध्य आशिया खंड येथील भाषा या याच कुळातील होत. या भाषांचे लेखी पुरावे अनातोलीयन भाषा, सायसेनियन ग्रीक भाषा यामध्ये कांस्य युगापासून मिळू लागले. या कुळातील सर्व भाषा त्या आधीच्या काळातील एका भाषेपासून उत्पन्न झाल्या असल्या पाहिजेत, ज्या बहुधा नवपाषाण युगात बोलली जात असावी. या भाषेचे पुनर्निमाण प्रोटो-इंडो-यूरोपीय भाषा म्हणून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थातच याचे कोणतेही लिखित प्रमाण आज उपलब्ध नाही. पण सांस्कृतिक आणि धार्मिक पैलूंवर आधारित प्रोटो-इंडो-यूरोपीय काळातील मानव कोणते शब्द वापरत होता त्याचा अंदाज घेतला जात आहे. तसेच त्याच्याशी संबंधित इतर संस्कृतींमध्ये, जिथून प्रोटो-इंडो-यूरोपीय मानव स्थलांतरित झाला, त्या भूभागावर प्राचीन आणि आधुनिक इंडो-युरोपीय भाषक यांच्याशी संबंधित भाषेचा अभ्यास केला जात आहे.
जगातील २० प्रमुख भाषांपैकी स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी, पोर्तुगीज, बांग्ला, रशियन, जर्मन, मराठी, फ्रेंच, इटालियन, पंजाबी आणि उर्दू ह्या १२ भाषा इंडो-युरोपीय कुळामधील आहेत.
वर्गीकरण
जगातील सर्व इंडो-युरोपीय भाषांचे साधारणपणे १० गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.

बाल्टो-स्लाव्हिकः (बाल्टिक)
इंडो-युरोपेतर भाषा
- अनातोलियनः अनातोलिया भागात अतिप्राचीन काळापासून ते मध्य युगाच्या सुरुवातीपर्यंत बोलल्या जाणाऱ्या व सध्या नष्ट झालेल्या भाषांचा एक समूह.
- हेलेनिकः प्राचीन व आजची ग्रीक भाषा व तिच्या इतर प्रकारांच्या भाषांचा समूह
- इंडो-इराणी
- इटालिकः लॅटिन व रोमान्स भाषा.
- सेल्टिक[१][२]
- जर्मेनिक
- आर्मेनियन
- तोचारियनः ग्रीसमधील लुप्त झालेल्या भाषांचा समूह
- बाल्टो-स्लाव्हिकः बाल्टिक भाषा (लात्व्हियन आणि लिथुएनियन) व स्लाव्हिक भाषांचा समूह
- आल्बेनियन[३][४]
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.