संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत, म्हणूनच संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हणले जाते.[ संदर्भ हवा ]

जलद तथ्य आरुवर्तिया संस्कृत भाषा, स्थानिक वापर ...
आरुवर्तिया संस्कृत भाषा
संस्कृतम्
स्थानिक वापर भारत
प्रदेश भारत
पर्व अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
लोकसंख्या सुमारे १४,०००
क्रम 701
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी देवनागरी, पाली(आता विलुप्त)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत (उत्तराखंड) हिमाचल प्रदेश, (महाराष्ट्र)
भाषा संकेत
ISO ६३९-१ 701
ISO ६३९-२ sanskrit
बंद करा
Thumb
गीता

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती,इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले व इसवी सन १२०० नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे.

कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. कवी कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् आणि ऋतुसंहार ही महाकाव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ]

भारताच्या सांस्कृतिक वारशात संस्कृतचा दर्जा, कार्य आणि स्थान भारताच्या आठव्या अनुसूची भाषांच्या संविधानात समाविष्ट करून ओळखले जाते. तथापि, पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करूनही, भारतात संस्कृतचे प्रथम भाषक नाहीत. भारताच्या अलीकडील प्रत्येक दशवार्षिक जनगणनेमध्ये, हजारो नागरिकांनी संस्कृत ही त्यांची मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे, परंतु ही संख्या भाषेच्या प्रतिष्ठेशी जुळवून घेण्याची इच्छा दर्शवते असे मानले जाते. प्राचीन काळापासून पारंपरिक गुरुकुलांमध्ये संस्कृत शिकवली जाते; हे आज माध्यमिक शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर शिकवले जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत १७९१ मध्ये स्थापन केलेले बनारस संस्कृत महाविद्यालय हे सर्वात जुने संस्कृत महाविद्यालय आहे. हिंदू आणि बौद्ध स्तोत्रे आणि मंत्रांमध्ये संस्कृतचा मोठ्या प्रमाणावर औपचारिक आणि धार्मिक भाषा म्हणून वापर केला जात आहे.

संस्कृत भाषेची निर्मिती

पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.

प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा

संस्कृत भाषेतील शब्द भांडार अतिशय समृद्ध आहे.धातूपासून शब्द,अनेक धतुसादिते आणि एका शब्दापासून अनेक शब्द अशी ही भाषा शब्द प्राचूर्याच्या शिखरावर दिसते.या भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द दिसून येतात. जसे :- ‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.

संस्कृत भाषेत एकेका देवाला ही अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णूसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही अनेक जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम हे त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.

संस्कृत भाषेचे मुख्य वेगळेपण म्हणजे वाक्यातील शब्द मागे पुढे जरी झाले तरी त्याचा अर्थ बदलत नाही.

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्‌।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) याचं अर्थ निश्चिती मुळे ही भाषा अंतराल क्षेत्रात उपयोगी ठरू शकते.

एकात्म भारताची खूण

प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून श्रीलंकापर्यंतगांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. पाणिनी पाकिस्तानचा, आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.

राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती... ‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राजभाषा, (संपर्क भाषा) व्हावी असे वाटे.[ संदर्भ हवा ]

सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)

कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते, यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.

ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.

जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.

मोगल आणि संस्कृत

मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउन्टर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

Thumb

पूर्वी संस्कृत लोकभाषा असावी. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक मानतात. संस्कृत ही सर्व भाषांची मातृभाष, आहे असे सुद्धा काही लोक मानतात .

लिपी

संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखिते अनेक लिप्यांत लिहिलीले जात असत; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.[ संदर्भ हवा ]

प्रणव

ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.त्यात अ , उ , मचा समावेश केला आहे.

स्वर

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ

व्यञ्जने

क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व् श्

ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.)

उच्चारस्थाने

सूत्र - अकुहविसर्जनीयानां कण्ठः

कण्ठ्यवर्ण - अ क् ख् ग् घ् ङ् ह्

सूत्र - इचुयशानां तालुः

तालव्यवर्ण - इ च् छ ज् झ् ञ य् श्

सूत्र - ऋटुरषानां मूर्धा

रूपे आणि वाक्यशास्त्र

संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्‍येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्‍यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.

उपसर्ग

संस्कृतभाषेत उपसर्ग आहेत. प्र हा पहिला असल्याने उपसर्गांना प्रादि (प्र+आदि) म्हणतात.

संस्‍कृत साहित्य

एके काळी भारताची ज्ञानभाषा संस्कृत होती. संस्कृत भाषेत भरपूर साहित्य निर्मिती झाली आहे. बाणभट्ट- कादंबरी; महाकवी कालिदास- अभिज्ञानशाकुन्तलम्, मेघदूत, कौटिल्य-अर्थशास्त्र, अश्वघोष-बुद्धचरितम् हे काही संस्कृत साहित्यामधील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे ग्रंथ आहेत.

संस्कृत भाषेची आताची स्थिती

२१व्या शतकात माहाराष्ट्रात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा फारसा प्रयत्‍न करत नाहीत, शाळेत केवळ एक विषय या हेतूने संस्कृत शिकली जाते.

संस्कृतचा अभ्युद्धार

संस्‍कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.

ग्रंथ संपदा

  • वेद
  • ऋक्‌संहिता
  • उपनिषद्
  • बृहत्‌संहिता
  • रसार्णव
  • अगस्त्य संहिता
  • वैशेषिक संहिता
  • दर्शने
  • न्यायदर्शने
  • न्यायकंदली
  • सूर्यसिद्धान्त
  • सिद्धान्त शिरोमणी

भारतात संस्कृतचा प्रचार करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती

  • श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र, नासिक. (प्रा. श्री. अतुल तरटे सर)
  • श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ (पुणे)
  • अजित मेनन
  • आनंद-पत्रिका (नियतकालिक)
  • आनंदाश्रम (पुणे)
  • Dr Ambedkar Hindi Sanskrit Vidyapeeth Bihar Cum Education And Training (ब्रेगुसराई, बिहार)
  • उषा (नियतकालिक)
  • कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक, महाराष्ट्र)
  • श्रीकाशी पत्रिका (नियतकालिक)
  • संगमनेर संस्कृत संशोधन केंद्र ( संगमनेर महाविद्यालय संगमनेर )
  • कौशलेन्द्र संस्कृत विद्यापीठ (दुर्ग, मध्य प्रदेश)
  • गाण्डीवम्‌ (नियतकालिक)
  • गीर्वाण (नियतकालिक)
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे, वगैरे)
    • Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
    • श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
  • डेक्कन कॉलेज (पुणे)
  • दिव्यज्योति (नियतकालिक)
  • नेपाळ संस्कृत विश्वविद्यालय
    • रूरू संस्कृत विद्यापीठ (ऋदी, नेपाळ)
    • शारदा संस्कृत विद्यापीठ (महेंद्रनगर, नेपाळ)
    • हरिहर संस्कृत विद्यापीठ (खिदीम, नेपाळ)
    • जनता संस्कृत विद्यापीठ (बिजौरी, नेपाळ)
    • कालिका संस्कृत विद्यापीठ (नेपाळ)
    • संस्कृत पाठशाळा (राजेश्वरी-काठमांडू, नेपाळ)
    • वाल्मीकी विद्यापीठ आणि राणीपोखरी संस्कृत माध्यमिक शाळा (काठमांडू, नेपाळ)
      • तीनधारा संस्कृत हॉस्टेल (काठमांडू, नेपाळ)
  • प्रभातम्‌ (नियतकालिक)
  • प्रसाद प्रकाशन (पुणे)
  • ब्राह्मण महा-सम्मेलनम्‌ (नियतकालिक)
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे)
  • भारतधर्म (नियतकालिक)
  • भारतश्री (नियतकालिक)
  • मिथिला संस्कृत विद्यापीठ (बिहार)
  • जगद्गुरू रामानन्दाचार्य राजस्थान संस्कृत विश्वविद्यालय (मडाऊ, जयपूर)
  • राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती)
  • राष्ट्रीय संस्कृत संस्थान (देवप्रयाग, उत्तराखंड); (नवी दिल्ली)
  • श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
  • लोक संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • पं. वसंतराव गाडगीळ
  • विद्या (नियतकालिक)
  • विश्व संस्कृतम्‌ (नियतकालिक)
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा (पुणे)
  • वैदिक संशोधन मंडळ (पुणे)
  • व्रजगंधा (नियतकालिक)
  • शारदा मासिक
  • शारदा (पत्रिका)
  • शारदा संस्था (प्रकाशन संस्था, वाराणशी)
  • श्यामला (नियतकालिक)
  • श्री श्रद्धा संस्कृत विद्यापीठ (लक्ष्मणगढ-सीकर, राजस्थान)
  • श्री (नियतकालिक)
  • कै. श्री.भा. वर्णेकर
  • सम्भाषण सन्देश (मासिक)
  • दैनिक संस्कृत (नियतकालिक, कानपूर)
  • संस्कृत अध्ययन केंद्र (तळेगाव-पुणे)
  • संस्कृत कॉलेज (बनारस)
  • संस्कृत गुरुकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
  • संस्कृत ग्रंथमाला
  • संस्कृत पाठशाळा (या अनेक आहेत, ८०हून अधिक पाठशाळांना केंद्र सरकारचे अनुदान आहे.)
  • संस्कृत प्रसारिणी सभा (पुणे)
  • संस्कृत भवितव्यम्‌ (नियतकालिक)
  • संस्कृत भारती (अखिल भारतीय संस्था, मुख्यालय - नवी दिल्ली)
  • संस्कृत महाविद्यालय (आणि विद्यापीठ, कलकत्ता) - स्थापना इ.स. १८२४)
  • संस्कृत विद्यापीठ (विशालखंड, गोमतीनगर, लखनौ)
  • संस्कृत श्री (नियतकालिक)
  • संस्कृत साकेत (नियतकालिक)
  • महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान (भरतपूर, उज्जैन)
  • सुप्रभातम्‌ (नियतकालिक)
  • स्विद्‌ (नियतकालिक)
  • हरियाणा संस्कृत अकादमी

संस्कृत नियतकालिके

इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत नियतकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती.

संस्कृत साहित्याविषयी मराठी पुस्तके

  • संस्कृत साहित्य शास्त्राची तोंडओळख (सरोज देशपांडे) आणि असंख्य

बाहेरील दुवे

जलद तथ्य
बंद करा

इंग्रजी दुवे

हे सुद्धा पहा

  • मणिप्रवाळम (संस्कृत आणि तमिळ भाषेच्या संगमाने तयार झालेली प्राचीन भाषा)

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.