भारताचे राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक From Wikipedia, the free encyclopedia
आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे. हे ग्रामीण लोकाचे आवडते माध्यम आहे
ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR), अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे.
आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे.
भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले.बी बी सी च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन स्थापन करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई केेंद्र निर्माण केले. मात्र प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागाअंतर्गत ’भारतीय राज्य प्रसारण मंडळ’ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे ’ऑल इंडिया रेडिओ’ असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.[ संदर्भ हवा ]
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.[१]
जरी १९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी ’आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे.
एक इटालियन शोधकर्ता, रेडिओ संप्रेषणाची व्यवहार्यता सिद्ध करते. त्याने १८९५ मध्ये इटलीमध्ये आपला पहिला आकाशवाणी सिग्नल पाठवला आणि प्राप्त केला. १८९९ पर्यंत त्याने इंग्रजी वाहिन्यांभोवती पहिले वायरलेस सिग्नल वाजविले आणि दोन वर्षांनंतर इंग्लंडकडून न्यूफाउंडलॅंड तेलाचे "एस" हे पत्र प्राप्त झाले. इटालियन शोधकर्ता आणि इंजिनियर ग्विलिएलमो मार्कोनी (१८७४-१९३७) पहिले यशस्वी दीर्घ-निर्वाह वायरलेस तारणाचे प्रक्षेपण आणि विपणन केले आणि १९०१ मध्ये प्रथम ट्रान्सहाटलांटिक रेडिओ सिग्नल प्रसारित केले. १९३७ मध्ये मारकॉनीचा मृत्यू झाला. १९४३ मध्ये टेस्लाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर सहा महिने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मार्चको सर्व रेडिओ पेटंट अवैध ठरविले आणि टेस्लाला रेडिओसाठी पेटंट दिले.
आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.
इतर कुठल्याही प्रसारणांपेक्षा (जसे की दूरदर्शन) रेडिओ सेट स्वस्त असल्यामुळे आकाशवाणी हे आजही तितकेच लोकप्रिय आहे. आकाशवाणीच्या एकूण २२९ प्रसारण केंद्रांपैकी १४८ केंद्रे ही मध्यमतरंग, ५४ केंद्रे ही लघुतरंग तर उरलेली १६८ ही एफ.एम. केंद्रे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताच्या ९१.७९% भागात सेवा पुरविते.
आकाशवाणी, दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला ‘सिग्नेचर टय़ून’ असे म्हणले जाते. आकाशवाणीची ही लोकप्रिय सिग्नेचर ट्यून पं. रविशंकर, पं. व्ही. जी. जोग, ठाकूर बलदेव सिंह यांनी तयार केली असे म्हणले जात असले तरी ते तसे नाही. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. १९३० च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे.
आकाशवाणीचया मुंबई केंद्रावरील ‘आपली आवड’, ‘कामगार सभा’, ‘युववाणी’, ‘भावसरगम’, ‘वनिता मंडळ’ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या. सकाळचे ठीक अकरा वाजले की आकाशवाणी मुंबई ‘कामगार सभा’ आणि त्यापाठोपाठ उद्घोषकाची ‘कामगारांसाठी’ अशी सूचना येई आणि मग दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय ‘सिग्नेचर ट्यून.’कानावर पडे. आकाशवाणीवरील अमाप लोकप्रिय ठरलेल्या ‘भावसरगम’ या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून यशवंत देव यांनी तयार केली आहे.
’दिल से’ या हिंदी चित्रपटातले बरेच प्रसंग हे आकाशवाणीच्या मुख्यालयाच्या आसपास चित्रित झालेले आहेत. तसेच ’रंग दे बसंती’ या चित्रपटातसुद्धा आकाशवाणीच्या प्रसारणाचा उपयोग केल्याचे दाखवले आहे.
१९०९ सालापासून दिल्लीहून सुरू असलेली राष्ट्रीय-आंतरारष्ट्रीय बातमीपत्रे ५ जून २०१७ रोजी बंद झाली. आता मराठी बातमीपत्रे मुंबईहून देणे सुरू झाले आहे.
दिल्लीहून मराठी बातम्या देणे १९३९ साली सुरू झाले. श्रीकांत मोघे, विश्वास मेहेंदळे यांसह उषा जोशी, दत्ता कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी, बाबुराव बावीसकर, माधुरी लिमये, मिलिंद देशपांडे, मृदुला घोडके, श्रीपाद मिरीकर यांसारख्यांनी ही बातमीपत्रे गाजवली. आता ही बातमीपत्रे दिल्लीहून प्रसरित होणे ५ जून २०१७ पासून बंद झाले आहे.
आकाशवाणीने २५ फेब्रुवारी १९९८ साली दूरध्वनीवर बातम्या देण्याची सेवा दिल्लीमध्ये सुरू केली. (आता बंद झाली आहे.) मात्र ही सेवा चेन्नई, पाटणा, बंगलोर,मुंबई व हैदराबाद या शहरांमध्ये सुरू आहे. लवकरच ही सेवा अहमदाबाद, इंफाळ, कलकत्ता, गोहत्ती, जयपूर, त्रिवेंद्रम, रायपूर, लखनौ व सिमला इथेसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आकाशवाणीने याच सेवेचा एक भाग म्हणून माहितीजालावरसुद्धा ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक तासाच्या इंग्रजी व हिंदी बातम्या या दुव्यावर वाचता येतात. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर नऊ भाषांमधून (आसामी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, मराठी) बातम्या वाचायला मिळतात.
आकाशवाणी ही भारताच्या विविध प्रदेश/भाषांप्रमाणे अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते. ’विविध भारती’ ही या सर्व सेवांमधली एक प्रमुख सेवा आहे. ही सर्वात जास्त व्यावसायिक तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सेवा आहे. या वाहिनीवर विविध प्रकारच्या बातम्यांबरोबरच चित्रपट संगीत, विनोदी कार्यक्रम, इत्यादी प्रसारित केले जातात.
विविध भारतीवर प्रसारित केले जाणारे काही कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
आकाशवाणीच्या विविध प्रसारण केंद्रांपैकी काही खालीलप्रमाणे (केंद्राचे नाव आणि प्रसरणाची तरंगवारंवारता) :
भारताबाहेरील देशांसाठीचा आकाशवाणीचा सेवा विभाग एकंदर २७ भाषांमध्ये प्रसारण करतो. हे प्रसारण मुख्यतः लघुतरंगांच्या माध्यमातून बाहेरील देशांमध्ये केले जाते. ’सामान्य बाह्य प्रसारण सेवा’ ही इंग्रजीमध्ये ८ तास सेवा देणारी प्रमुख सेवा आहे.
युववाणी सेवा ही युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली सेवा आहे. युववाणी ही अनेक दिग्गजांसाठी कारकीर्दीचा आरंभ करण्याची जागा होती. उदा. प्रफुल ठक्कर, रोशन अब्बास, गौरव कपूर, कौशल खन्ना, इत्यादी.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.