मध्यप्रदेशात भोपाळपासून सुमारे अडीचशे किलोमीटर दूर धार जिल्हा आहे. त्याला भोजराजाची धारानगरी म्हणतात. हे शहर म्हणजेच ११व्या शतकातील माळवा राज्याची राजधानी. ज्या भोजराजाने हे शहर वसवले त्या राजाची मोठे मोठे विद्वान आजतागायत प्रशंसा करत आले आहेत.
भोज राजा हा केवळ प्रतिभावंतच नव्हता तर तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा ज्ञाता होता. त्याने वास्तुशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, योग, साहित्य आणि धर्म यावर अनेक ग्रंथ लिहिले आणि टीका – टिपण्णी देखील केली आणि ती कोणत्याही विद्वानांच्या तोडीची होती.
असे म्हणतात की मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ हे एके काळी "भोजपाल" म्हणून ओळखले जाई.
भोजपाल म्हणजे ज्याचा पालनकर्ता, राजा भोज आहे असे ते. नंतर त्याचा अपभ्रंश होत होत त्यातील ज हे अक्षर जाऊन त्याचं नाव "भोपाल" पडले. भोपाळ शहरात प्रवेश करतानाच बड्या तलावापाशी भोज राजाची एक विशाल मूर्ती आपल्या नजरेस पडते. ११ व्या शतकात भोजराजाने कित्येक मंदिरे बांधली. इमारती बांधल्या. त्यातली एक म्हणजे भोजशाळा. भोज राजा सरस्वतीचा उपासक होता. त्याने शिक्षणाच्या प्रसारासाठी भोजशाळा उघडली. भोजशाळेत सरस्वतीच्या एका मूर्तीचीसुद्धा स्थापना केली होती, जी आज लंडनमध्ये आहे.
पण आज आपण या भोजराजाला ओळखतो ते “कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली " या म्हणीमुळे. तर कोण होता हा गंगू तेली… तर गंमतीची गोष्ट अशी की गंगू तेली अशी कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती.
"गंगू तेली नहीं अपितु गांगेय तैलंग"
गंगू तेली नव्हे, तर गांगेय तैलंग
गंगू म्हणजे गांगेय कलचुरि नरेश आणि तेली म्हणजेच चालुका नरेश तैलय. या दोन्ही राजांनी संयुक्त सेना घेऊन भोजराजावर आक्रमण केले. हे दोघे दक्षिणेकडचे राजे होते. त्यांनी धार नगरीवर आक्रमण केले होते. एकत्र येऊनसुद्धा भोजराजाला ते हरवू शकले नव्हते. त्यांचा या युद्धात सपेशल पराभव झाला. तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणाली “कुठे राजा भोज आणि कुठे गांगेय तेलंग”. त्याचा अपभ्रंश होऊन नंतर लोक “गंगू तेली” म्हणू लागले. आणि त्यातून “कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली” ही म्हण रूढ झाली.
[[File:Gol ghar bhopal.jpg|
- thumb|गोळघर]
भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था, भोपाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, गांधी चिकित्सा महाविद्यालय तथा अनेक शासकीय व पब्लिक शाळा आहेत.