Remove ads
मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेता From Wikipedia, the free encyclopedia
श्रीकांत राम मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ६ नोव्हेंबर १९२९; - पुणे, ६ मार्च २०२१, पुणे) हे एक मराठी नाट्य-चित्रअभिनेते होते. मराठी कवी कै. सुधीर मोघे यांचे हे थोरले बंधू होत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले.
महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.
श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.
’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.
१९४०-४१ : शाळेत असताना ना.धों. ताम्हनकर लिखित ‘पारितोषिक’ व ‘विद्यामंदिर’ या नाटकांत भूमिका.
१९५१-५२ :आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत सहभाग
१९५८ : दिल्लीत झालेल्या ’तुझं आहे तुजपाशी’च्या प्रयोगात ‘श्याम’ची भूमिका
१९५९-६० : दिल्लीत झालेल्या ‘कृष्णाकाठी कुंडल’ या नाट्यप्रयोगात भूमिका
१९६१ : मुंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून बदली
श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती.
पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.
पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु, अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी १९५६मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली.
नंतर, १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित सेंटेनरी ड्रामा फेस्टिव्हलमध्ये ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील नायक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत मोघे यांच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. त्याच वर्षी श्रीकांत मोघे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून लागले.
त्या सुमारास पु.ल. देशपांडे दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकातली एक भूमिका दिली.
श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ’नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन ६ फेब्रुवारी २०१५ रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात झाले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.