छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्यातील शहर From Wikipedia, the free encyclopedia

छत्रपती संभाजीनगरmap
Remove ads

छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.[] फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव "औरंगाबाद" बदलून "छत्रपती संभाजीनगर" असे केले.[]

हा लेख छत्रपती संभाजीनगर शहराविषयी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या



या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.
जलद तथ्य
Remove ads
Remove ads

इतिहास

पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ.स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अलाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये, दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद (सध्याच्या संभाजीनगरमध्ये) येथे वेडा महंमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि, मुहम्मद बिन तुघलक यांनी १33४ मध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. १४९९ मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहिल्यानगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल वाइसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून "औरंगाबाद" केले आणि त्यास मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनविली. १७२४ मध्ये दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम, पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ मध्ये हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवले होते. ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि १५० वर्षे ते तसे राहिले. १९५५ पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचा भाग राहिले. १९६० मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.[]


औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता.

सतरावे शतक

इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहिल्यानगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आले. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये औरंगजेब याचे अहमद नगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे.

अठरावे शतक

इ.स. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे आला.

एकोणिसावे शतक

इ.स. १८८९ मध्ये औरंगाबाद मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला.

विसावे शतक

निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवीशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योगव्यवसायाला प्रारंभ झाला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थांनातही देशाच्या अन्य भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले.

नामांतर

या शहराला "औरंगाबाद" हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव "खडकी" होते.[] शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी अनेकदा मागणी केली होती.[][]

२९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी १७ जुलै २०२२ रोजी "संभाजीनगर" नावाचा विस्तार करून "छत्रपती संभाजीनगर" असे शहराचे नामांतर केले. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ ला भारत सरकार कडून सुद्धा औरंगाबाद या शहराला 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णयास मंजूरी देण्यात आली.[] तथापि, यावेळी औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद तालुका यांचे नामकरण झाले नव्हते.

Remove ads

भूगोल

अधिक माहिती माहिती हवामान तक्ता - छत्रपती संभाजीनगर ...

भौगोलिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर उत्तर अक्षांश १९°५३'४७" - पूर्व रेखांश ७५°२३'५४" याठिकाणी वसलेले आहे. हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो. अनेक लहानलहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात. ते दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्या मध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते.

तापमान : छत्रपती संभाजीनगरचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.[]

पर्जन्यमान : पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते.

साचा:Infobox Weather

Remove ads

रचना

औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग, खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते.

प्रशासकीय व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकूण आठ झोन मध्ये ११८ वॉर्डात महानगरपालिका क्षेत्राची विभागणी झाली आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था अस्तित्वात आहे.

लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत.औरंगाबाद (पूर्व) औरंगाबाद (मध्य) आणि औरंगाबाद (पश्चिम) अशी या तीनही विधानसभा मतदारसंघांची नावे आहेत

अधिक माहिती लोकसभा मतदारसंघ, विधानसभा औरंगाबाद पूर्व ...
Remove ads

अर्थव्यवस्था

Thumb
प्रोझोन मॉल औरंगाबाद

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबाद जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो

कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबाद जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.

उद्योगधंदे

येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे.

  • गरवारे
  • अजंता फार्मा
  • लुपिन फार्मा
  • विप्रो
  • एंडुअरन्स सिस्टिम्स
  • ऋचा इंजिनिअरिंग
  • कॅनपॅक
  • इंडोजर्मन टूलरूम

प्रोझॉन मॉल येथील मोठा बाजार आहे.

Remove ads

सांस्कृतिक जीवन

साहित्य

जेष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, साहित्यिक प्र . ई. सोनकांबळे, कवी वीरा राठोड, कविवर्य प्रा.दासू वैद्य, बालकवी गणेश घुले आदी अनेक नावे उल्लेखनीय आहेत.

नाट्य

ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यान पर्यटनाच्या दृष्टीतून अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याच औरंगाबादने कितेक वर्षांपासून नाट्य व सिने क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम अव्वल स्थानी राखून आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक अजित दळवी द्वारा लिखित अनेक नाटकांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनावर कोरलीत. अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. शिवाय प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चला हवा फेम योगेश सिरसाठ, बाळू मामांच्या नावाने चांगभल, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची ग जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दिपक अंभुरे, प्रविण डाळिंबीकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे, आदी दिग्गज कलावंतानी आपल्या करीयरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार देशमुख, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक नामवंत कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्यातही. 'व-हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.

संगीत

नामांकित असे यशराज मुखाटे उत्कृष्ट संगीत करणारे हे देखील संभाजीनगर चे आहेत .

चित्र-शिल्प

Remove ads

वाहतूक

हवाई वाहतूक

छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. २००८ पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर आहे.

रेल्वे वाहतूक

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (स्टेशन कोड:AWB) हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे.

रस्ते वाहतूक

छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर ८५ कि.मी. एवढे आहे.

Remove ads

शिक्षण संस्था

विद्यापीठ

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने "मराठवाडा विद्यापीठ" याचे नाव बदलून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे केले. या विद्यापीठाच्या परिसरामध्ये १६व्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेला सोनेरी महाल आहे. त्यासोबत फुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापण करण्यात आले. हे मुंबई व नागपूर नंतर राज्यातील तिसरे आणि अंतिम राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. हे भारताच्या २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे.

अभियांत्रिकी

वैद्यकीय

  • शासकीय वैद्यकीय महविद्यालय व शासकीय कर्क रोग रुग्णालय औरंगाबाद
  • म.गा.मि. वैद्यकीय महविद्यालय
  • शासकीय दंतविद्या महाविद्यालय
  • भगवान होमियोपेथिक महाविद्यालय
  • फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक महाविद्यालय्
  • वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी
  • सायली चेरिटेबल ट्रस्ट होमियोपेथिक महाविद्यालय

कला, वाणिज्य आणि विज्ञान

  • सरस्वती भुवन महविद्यालय
  • देवगिरी महविद्यालय
  • विवेकानंद महविद्यालय
  • पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
  • मौलाना आझाद महाविद्यालय
  • वसंतराव नाईक महाविद्यालय
  • छत्रपती शिवाजी महाविद्यालय
  • मिलिंद महाविद्यालय
  • शासकीय महाविद्यालय
  • माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय
  • महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय
  • मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • यशवंत कला महाविद्यालय Archived 2020-09-23 at the Wayback Machine.

व्यवस्थापन महाविद्यालये

  • मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेन्ट & रिसर्च
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
  • मौलाना आ़झाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट

शाळा

बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील शाळा आहे. ही शाळा १९७६मध्ये सुरू झाली. हिचा परिसर प्रगती कॉलोनी भागात आहे. या शाळेत सुमारे ४५० विद्यार्थी ८वी ते १०वीचे शिक्षण घेतात.

हॉस्पिटल

  • श्रद्धा हास्पिटल
  • कमलनयन बजाज हॉस्पिटल
  • सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल
  • एम.जि.एम वैद्यकीय महविद्यालय व हॉस्पिटल
  • हेडगेवार हॉस्पिटल
  • माणिक हॉस्पिटल आणि रिसचॅ सेंटर
  • सिंघमा हॉस्पिटल
  • दुनाखे हॉस्पिटल
  • सिटी केयर हॉस्पिटल
  • सरकारी कैंसर हॉस्पिटल
  • मॉस्क हॉस्पिटल
  • लिलावती हॉस्पिटल
  • गोल्डन केयर हॉस्पिटल
  • रोपळेकर हॉस्पिटल
  • आधार क्रिटिकल हॉस्पिटल
  • ब्रैन हॉस्पिटल
  • चौबे हॉस्पिटल
  • साई युरोलॉजी हॉस्पिटल
  • साई हॉस्पिटल
  • डागा हॉस्पिटल
  • न्यु लाईफ हॉस्पिटल
  • पाटिल हॉस्पिटल
  • डॉ.काळबांडे हॉस्पिटल
  • प्यासिफिक हॉस्पिटल
  • आयकान हॉस्पिटल
  • शासकीय वैदकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी
  • औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय चिकलठाणा औरंगाबाद
  • शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबाद
  • मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूड
Remove ads

प्रेक्षणीय स्थळे

  • खुल्ताबाद
  • व्हॅली ऑफ सेन्ट्स
  • दरवाजे
  • हिमायत बाग
  • खंडोबा मंदीर
  • म्हैसमाळ
  • संत ज्ञानेश्वर उद्यान
  • पैठण
  • जायकवाडी धरण पक्षी अभयारण्य
Thumb
बीबी का मकबरा

इथे अंदाजे १५०० सुफी संतांना दफनविण्यात आलेले आहे.[ संदर्भ हवा ] देवगड - दत्ताचे देवस्थान. मुघल शासनकाळात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत

  • प्रोझोन मॉल
  • डी मार्ट मॉल
  • रिलायन्स मॉल

हॉस्पिटल

घाटी - मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय. याठिकाणी विदर्भ, खानदेशातील रूग्णही उपचारासाठी येतात. तसेच अद्यावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धती केली जाते.

दरवाजे

भारतात इतर अनेक मध्ययुगीन शहरांपासून औरंगाबादला उभे राहिलेल्या गोष्टींपैकी 52 गोष्टी "गेट्स" आहेत, त्यापैकी प्रत्येक स्थानिक इतिहासाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्ती होत्या. औरंगाबादला "सिटी ऑफ गेट्स" म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखले जाते.

52 पैकी केवळ 4 मुख्य आणि 9 इतर गेट टिकून आहेत, सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या निजाम पॅलेस (पॅलेस ऑफ निजाम) जवळ भडकल गेट आहे. वाडीचा किल्ला. सोयगाव शहारा पासून 4 किमी अंतरावर वडीचा किल्ला आहे येथील निसर्गरम्य वातावरण प्रेक्षणीय आहे.

संदर्भ

Loading content...

बाह्य दुवे

Loading content...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads