तथागत बुद्धांनी स्थापन केलेला धर्म From Wikipedia, the free encyclopedia
बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism / बुद्धिझम) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धम्म (जीवन जगण्याची विचारधारा) आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्म हा एक सत्य अनादि शुद्ध सद्धम्म आहे.याचे वर्णन धम्मपदा मध्ये आणि याच सद्धम्मामार्गापासुन अनेक पंथाची उत्पति झाली आहे. तसेच हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे त्यासबौद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माचे धम्मचक्कपरिवर्तन करून महान उपदेश दिले आहे बौद्ध धर्माची स्थापना स्वतः बुद्धत्वापासुन झाली आहे कारण बुद्धांची परंपरा ही अनादि आहे भगवान गौतम बुद्धाच्या पहिल्या पण बुद्ध होउन गेले आहेत त्यामुळे तीच अनादि परंपरा गौतम बुद्धानी पुढे नेली आहे याचा उल्लेख त्रिपीटक ग्रंथ (बुद्ध वंश) यामध्ये आढळून येतो. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच जगभरात पसरला. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.[1]
या लेखाला मुखपृष्ठ सदर लेख होण्यासाठी मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे त्याला नोंदवण्यात आले आहे. मुखपृष्ठावरील सदर लेख हे विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख असतात व त्यांच्यातील परिपूर्णता विकीपीडियावरील इतर सदस्यांकडून तपासली जाते व मगच ते विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर झळकतात. आपणही या लेखासंबंधी प्रतिक्रिया देऊ व सुधारणा सुचवू शकता. कृपया या लेखावर येथे प्रतिक्रिया द्या. |
संस्थापक | गौतम बुद्ध |
---|---|
स्थापना | इ.स.पू. ६वे शतक |
स्थान | भारत |
अनुयायी | १८० कोटी |
प्रमुख तीर्थस्थळे | लुंबिनी, गया, कुशीनगर, सारनाथ |
धर्मग्रंथ | तिपिटक |
संप्रदाय | थेरवाद, महायान, वज्रयान, नवयान |
एका अहवालानुसार, जगातील सुमारे १.८ अब्ज ते २.१ अब्ज (२५% ते २९%) लोकसंख्या बौद्ध धर्माची अनुयायी आहे.[2][3] लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा ख्रिश्चन धर्मानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.[4] सर्वाधिक बौद्ध अनुयायी चीन राहतात. काही अहवालांनुसार, ८०% ते ९१% चिनी लोकसंख्या (११० कोटी ते १२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे.[5] बौद्ध धर्म हा जगातील २०० पेक्षा अधिक देशांत असून २० देशांत बहुसंख्यक आहे. आज सर्वच खंडांत तथागत बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत ख्रिश्चन धर्मानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी बौद्ध धर्माला (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू, दलित धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायित्व पत्करले आहे त्यामुळे या सर्व बौद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. यानुसार बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्मसुद्धा ठरतो.
कालानुक्रम: बौद्ध परंपरांचा विस्तार आणि विकास (इ.स.पू. ४५० ते इ.स. १३००) | |||||||||||||||||||||
इ.स.पू. ४५० | इ.स.पू. २५० | इ.स. १०० | इ.स. ५०० | इ.स. ७०० | इ.स. ८०० | इ.स. १२०० | |||||||||||||||
| |||||||||||||||||||||
प्रारंभिक |
|
|
|
||||||||||||||||||
प्रारंभिक बौद्ध परंपरा | महायान | वज्रयान | |||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||
|
|
||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
श्रीलंका आणि |
|
|
|
|
|||||||||||||||||
थेरवाद | |||||||||||||||||||||
|
|
|
|||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
|
प्राचीन तिबेटी बौद्ध धर्म |
||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||
Kadam | |||||||||||||||||||||
Kagyu |
|
||||||||||||||||||||
Dagpo | |||||||||||||||||||||
Sakya | |||||||||||||||||||||
Jonang | |||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
पूर्व आशिया |
प्राचीन बौद्ध संस्कृती |
Tangmi |
|||||||||||||||||||
नांतो रोकुषु किंवा नारा रोकुषु(Nanto Rokushū|NaraRokushū) |
|||||||||||||||||||||
चान बौद्ध धर्म |
| ||||||||||||||||||||
Thiền, कोरियन सेआॅन | |||||||||||||||||||||
जपानी झेन | |||||||||||||||||||||
Tiantai / जिंगतू |
| ||||||||||||||||||||
तेंदाई |
| ||||||||||||||||||||
ज्युदो शू |
|||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
मध्य आशिया |
|
ग्रीक बौद्ध धर्म |
|||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||
रेशीम मार्ग बौद्ध धर्म |
|||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||
इ.स.पू. ४५० | इ.स.पू. २५० | इ.स. १०० | इ.स. ५०० | इ.स. ७०० | इ.स. ८०० | इ.स. १२०० | |||||||||||||||
|
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्म हा भारतातील एक अतिप्राचीन, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ व परिवर्तनशील धर्म आहे. बौद्ध धम्म हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात या धर्माच्या उदयाला मोठे स्थान आहे.बुद्ध धम्म हा अति प्राचीन आहे , गौतम बुद्ध यांचे पूर्वी पन 21 बुद्ध होउन गेले , त्यांची माहिती ही त्रिपिटक या बुद्ध ग्रंथामध्ये सापड़ते। शिवाय पूर्व बुद्ध यांची नावे सुद्धा शिलालेखावर लिहिलेलेली आहेत। मोहोंजोदडो तसेच हड़प्पा या संस्कृति मध्ये बुद्ध स्तूप , चैत्य , शिल्पकला सापड़ली आहेत । त्यावरुण हे सिद्ध होते की बुद्ध धम्म हा साधारण ४००० ते ५००० ई. पू.उदयास आला आहे। त्यानुसार बुद्ध धम्म हा दोन कलावधित मांडला जाइल। पूर्व बुद्ध युग आनी गौतम बुद्ध युग । पूर्व बुद्ध युगविषयी पूर्ण माहिती अजुन प्राप्त नाही झाली । गौतम बुद्ध यांच्या नंतर च्या इतिहासाची बरीच माहिती उपलब्ध आहे। त्यानुसार गौतम बुद्ध यांच्या बौद्ध धम्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यांत आढळते. तर बौद्ध धम्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने जगातील अनेक देशांमध्ये पसरले. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, चैत्य, चैत्य व लेण्या ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ १,१०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारताच्या जीवनविषयक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धम्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.
बौद्ध धम्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धम्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात मुसलमानांची आक्रमणे भारतात झाली. भारतातून बौद्ध धम्माचा प्रभाव कमी करून लापविन्याचे काम हिंदू धर्म (वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म) याने केला आहे। बुद्ध मूर्ति चे हिंदूकरण केले । हिंदू राजांनी केलेले अत्याचारही कारणीभूत आहेत। .[6]
तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला.
बौद्ध अनुयायी लोक गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली, अशा मागील १० हजार वर्षामधील जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या गेलेल्या १०० विश्वमानवांची यादी तयार केली होती. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’
‘शाक्यमुनी’ (शाक्यांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. बुद्ध हे बौद्ध धर्माचे मुख्य स्तंभ आहेत. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता, इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.
ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
इ.स.पू. ४८३मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.
उत्तर प्रदेशातील कुशीनगरयेथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांचा अत्यंसंस्कार जेथे झाला,तेथे रामाभर स्तूप उभारला आहे.
भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितलेले आहेत.
भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
महान बौद्ध विद्वान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे ही दोनच आर्यसत्त्वे महत्त्वाची आहेत. पहिले - दुःख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दुःख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.
बुद्धांनी आपल्या अनुयायांना खालील पाच शीलांची शिकवण दिलेली आहे.
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगिकार केला तर मानवी अस्तित्त्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.
महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.
बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमिता ह्या शील मार्ग होत.
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी / विज्ञाननिष्ठ आहे. खालील बाबींत विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे. विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे - ‘सत्याचा शोध’.
विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्त्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धान्त अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे.
विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही, हा सिद्धान्त तथागत भगवान बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला. शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे. त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही.
नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुणाचाही जन्म होत नाही. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखी नवीन विज्ञानाच्या नवीन अविष्कार याचा समावेश असतो, कारण आपोआप काहीही होत नाही. म्हणजेच अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धम्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, ‘आपण कोण आहात?’ तेव्हा तथागत म्हणतात की, ‘राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा मी औरस पुत्र आहे. परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज.’
विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण केल्यास, धम्म अनुसरल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो.
भगवान बुद्धांनी कर्म सिद्धान्त सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद, नशीब यांवर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे.
उत्क्रांती वादाचा जनक चार्ल्स डार्विन १९व्या शतकात होऊन गेला. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्विनचा १९व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धान्त आधी २५०० वर्षापूर्वी इ.स.पू. ६व्या शतकात भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितला आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय.
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तर या आणि पहा तुमच्या बुद्धीला पटेल तरच धम्माचा स्वीकार करा. तसेच धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये जात, पंथ, लिंग इत्यादी कोणताही भेद नाही.” विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम आहे, असे विज्ञान मानीत नाही, म्हणजे बौद्ध आचारसंहिता व विज्ञान यामध्ये हे साम्य आहे.
जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर (नित्य) असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही. असे विज्ञान स्पष्ट सांगते. भगवान बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे. सर्व बदलत असते, सर्व सजीवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो.
प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्त्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धान्त म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही ही कुठल्याना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले.
बौद्ध धर्माचा जगातील सर्व समाज जीवनावर प्रभाव पडलेला आढळतो. कारण बौद्ध धर्म सर्व श्रेष्ठ धर्म आहे .
बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.
वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.
बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.
तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.
विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.
करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.
वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुंफा) - खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.
बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्याशुभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.
बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.
बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खु हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.
बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हॉंगकॉंग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीन व जपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांची ब्रह्मी लिपीत भाषांतरे झाली आहेत.
बौद्ध धर्माचे बुद्ध, धर्म, संघ या प्रमाणेच अन्य महत्त्वाची प्रतीके वा चिन्हे आहेत.
महायान, थेरवाद, वज्रयान, नवयान इत्यादी बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय किंवा पंथ आहेत. यांच्याशिवाय शेकडो बौद्ध संप्रदाय आजही अस्तित्त्वात आहेत.
संपूर्ण जगात जवळजवळ १.८ अब्ज (१८० कोटी) बौद्ध आहेत. यामध्ये साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि उर्वरित २५% से ३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान यांच्या व्यतिरिक्त बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय किंवा उपपंथसुद्धा आहेत परंतु त्यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात जास्त बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाच्या सर्व देशांत बहुसंख्याकांच्या रूपात राहतात. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे. आशिया खंडाची जवळजवळ अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा सखोल प्रभाव आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका और युरोप सारख्या खंडांमध्ये सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पेक्षा अधिक देश असे आहेत की, जिथे बौद्ध धर्म बहुसंख्याक किंवा बहुमतात आहे. जगात काही देश असेही आहेत की जिथे बौद्ध लोकसंख्येबद्दल कोणतीही विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.
देश | बौद्ध लोकसंख्या | बौद्ध टक्केवारी |
---|---|---|
चीन | १,२२,५०,८७,००० | ९१%[7] |
जपान | १२,३३,४५,००० | ९६%[8] |
व्हिएतनाम | ७,४५,७८,००० | ८५%[9][10] |
भारत | ६,७९,८७,८९९ | ०६%[11] |
थायलंड | ६,४६,८७,००० | ९५% |
म्यानमार | ४,९९,९२,०००० | ९०% |
दक्षिण कोरिया | २,४६,५६,००० | ५४% |
तैवान | २,२१,४५,००० | ९३%[12] |
उत्तर कोरिया | १,७६,५६,००० | ७२% |
श्रीलंका | १,६०,४५,६०० | ७५%[13][14] |
कंबोडिया | १,४८,८०,००० | ९७% |
इंडोनेशिया | ८०,८५,४०० | ०३% |
हाँग काँग | ६५,८७,६०३ | ९३% |
मलेशिया | ६३,४७,२२० | २२% |
नेपाळ | ६२,२८,६९० | २१% |
लाओस | ६२,८७,६१० | ९८%[15] |
अमेरिका | ६१,५९,९०० | ०२% |
सिंगापूर | ३७,७५,६६६ | ६७% |
मंगोलिया | ३०,५५,६९० | ९८% |
फिलिपाईन्स | २८,६७,५९५ | ०३% |
रशिया | २०,९६,६०८ | ०२% |
बांग्लादेश | २०,४६,८०० | ०१% |
कॅनडा | २१,४७,६०० | ०३% |
ब्राझील | ११,४५,६८० | ०१% |
फ्रान्स | १०,५५,६०० | ०२% |
बौद्ध धर्म व गौतम बुद्ध यांच्याविषयी जागतिक विचारवंत व जगप्रसिद्ध व्यक्तींची मते खाललप्रमाणे आहेत.
माझ्या मतानुसार बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याचेशी तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे माझे माझे पक्के मत सर्व धर्मांचा २१ वर्षे सखोल अभ्यास केल्यावर झाले आहे. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“भविष्य काळातील धर्म हा वैश्विक धर्म असेल, तो व्यक्तिगत शरीरधारी ईश्वराच्या पलीकडचा, ठाम निश्चित अशा परंपरेने पाळत असलेल्या मतप्रणाली, तसेच पराप्राकृतिक ईश्वराचा शोध घेणाऱ्या शास्त्रांना बाजूला ठेवणारा असेल. विज्ञानाच्या गरजांची जर कोणता धर्म परिपूर्ती करीत असेल तर तो फक्त बौद्ध धर्म आहे. — अल्बर्ट आईन्स्टाईन
बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अर्हत, तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ, तसाच श्रेष्ठतम सदाचारीही असला पाहिजे. बौद्ध धर्मात ज्ञान हे मुक्ती (निर्वाणासाठी) अनिवार्य मानले गेले आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक कारण आहे. (दुसरे कारण लोभ किंवा तृष्णा होय.) ह्या उलट ख्रिश्चन आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. जगातल्या दु:खापैकी पुष्कळशी दु:खे दृष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. — डब्ल्यू. टी. स्टेस, ग्रंथ - बौद्ध धर्माचे नीतीशास्त्र (Buddhism Ethics)
बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही. आपली दृष्टी स्पष्ट असण्याबाबत बौद्ध धर्माव्यतिरीक्त कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी (चित्त संस्कारासाठी) इतकी सखोल योजना प्रस्तुत करण्यात आली नाही. — ई. जे. मिल्स, ग्रंथ - बौद्ध धर्म (Buddhism)
बौद्ध धर्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हितकारक सामर्थशाली देणगी आहे, बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेरिअन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मतप्रणालीची बाह्य शक्ती नाकारून मानवाला अंतर्यामी असलेल्या मार्गदिपाचा अधिकार मान्य करतात. युनिटेरिअन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त व तथागत बुद्ध हे जीवनाचे सर्वोच्च भाष्यकार आहेत असे मानतात. — रेव्हरॅंड लेस्ली बोल्टन, युनिटेरिअन ख्रिस्ती पाद्री
आधुनिक विज्ञान हे बौद्ध धर्मातील अनित्यता आणि अनात्मवादाच्या सिद्धांताचे प्रतिध्वनी होत. — डॉ. रंजन रॉय
मानवावर बाह्य शक्तींनी दीर्घकाळापर्यंत अधिकार गाजवला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्त्वानुसार स्वशासनाचा स्वीकार करावा. बौद्ध धर्म यात जगातील पहिली नैतिक विचारधारा आहे, जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन (स्वशासन) करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धर्माची आवश्यकता आहे. — ई. जी. टेलर, ग्रंथ - बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा (Buddhism and Modern Thought)
जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, तेव्हा कोट्यवधी संवत्सरांतील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेली उत्क्रांतीची गाथा वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा ईश्वर प्रेमरूप आहे हे मत किती फसवे आहे याची जाणीव होते. बुद्धाचा धर्म हा कितीतरी निराळा धर्म आहे. — विनवुड रीड, ग्रंथ - मानवाचे हौतात्म्य (Martyrdom of Man)
बौद्ध धर्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंतःसामर्थ्यांच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. वेदांमध्ये आपणांस प्रार्थना, पूजा, प्रशंसा आढळते. बौद्ध धर्मात प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी चित्ताच्या (मानसिक) संस्काराचे महत्त्व सांगितल्याचे आढळते. — आर. जे. जॅक्सन
बौद्ध धर्म एक अदभुत धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. — मार्क झुकेरबर्ग
“बुद्धांच्या ह्रदयाचा एक लक्षांशही मला लाभला तर मी स्वतःला धन्य मानले असते.” — स्वामी विवेकानंद
“अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशुहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वतःचे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली.” — स्वामी विवेकानंद
“बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही.” — स्वामी विवेकानंद
“बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांंपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. ते म्हणाले होते की, "कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नका. वेद हे थापाडे आहेत. शास्त्रे जर माझ्या अनुभूतींशी वा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचेच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वतः मीच आहे. यागयज्ञ आणि देवदेवतार्चन निष्फळ होय जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्राची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते.” — स्वामी विवेकानंद
“बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता... इतर सर्वच दार्शनिकांनी वा तत्त्वज्ञांनी थोड्याबहुत प्रमाणात सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलेच आहे. समाजाच्या खुळचट समजुतींची खुशामत केली आहे.” — स्वामी विवेकानंद
“भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरुष या अवनीतलावर अन्य कुणी झाला नाही.” — स्वामी विवेकानंद
“मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. ‘सर्व जीव समान आहेत’ असा उपदेश बुद्ध करीत. बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपाननिषेधाचा पुरस्कार केला आहे.” — स्वामी विवेकानंद
“जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर सर्वांनीच आपण ईश्वरावतार, ईश्वरदूत, ईश्वरपुत्र आहोत अशी घोषणा केलेली आहे, आणि ते असेही सांगून गेले आहेत की, त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तोच स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्ध मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हेच म्हणत असत, “कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी साहाय्य करू शकणार नाही. स्वतःच स्वतःला साहाय्य करा, स्वतःच्याच प्रयत्नांची मुक्तिलाभाची कास धरा.” स्वतः संबंधी ते म्हणत, "बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञानसंपन्न; मी सिद्धार्थ गौतमाने ती अवस्था प्राप्त करून घेतली आहे. तुम्हीही जर तिच्यासाठी प्राण पणास लावून प्रयत्न कराल तर तुम्हालीही ‘बुद्धत्व’ प्राप्ती होऊ शकेल." ” — स्वामी विवेकानंद
“भारतात आज हे जे संन्याशांचे मठ वैगरे दिसतात ते सारे बौद्ध धर्माच्या अधिकाराखाली होते. हिंदूनी आता त्या साऱ्यांना आपल्या रंगाने रंगवून स्वतःचे करून घेतले आहे. बुद्धांपासूनच यथार्थ संन्यासाश्राचा पाया रचला गेला. त्यांनीच संन्यासाश्राच्या मृत सांगड्यात प्राण ओतले.” — स्वामी विवेकानंद
“बुद्धांचा हजारावा अंश माझ्यात असता तर मी स्वतः ला धन्य समजलो असतो.” — स्वामी विवेकानंद
“बुद्धांनी प्रचंड शक्तिशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक संदेश होता. सर्व माणसे समान आहेत, याला काही अपवाद नाही.” — स्वामी विवेकानंद
“बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते. आध्यात्मिकता प्राप्त करून घेण्याचा प्रत्येक पुरुषाला व स्त्रीला सारखाच हक्क आहे, ही त्यांची शिकवण होती.” — स्वामी विवेकानंद[16]
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सदाचार शिकवणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शाक्यमुनी गौतम बुद्धांखेरीज संपूर्ण मानवजातीत येशू ख्रिस्तांएवढा थोर पुरुष दुसरा झाला नाही. — रेनन, प्रसिद्ध ख्रिस्तपंडित
जगातल्या सर्व धर्मसंस्थापकास भगवान बुद्ध हेच फक्त असे थोर होते की, जे आपली मुक्तिसाध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल? बुद्धांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा (ज्ञान) व मैत्रीच्या (प्रेम) शिखरावर (त्याला) प्रस्थापित करून श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले आहे. — ड्वाईट गोडार्ड
बुद्ध अवतार माझीया आदृष्टा ।
मौन्य मुखे निष्ठा धरियली ।
— संत तुकाराम
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध ।
शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे ।।
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.