नांदेड
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर. / From Wikipedia, the free encyclopedia
नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.[1]
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
?नांदेड नंदीतट महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: हुजुरसाहेब (अबचलनगर) | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
६३.२२ चौ. किमी • ३६२ मी |
अंतर • लातूर पासून • परभणी पासून • यवतमाळ पासून |
• १३५ किमी नैर्ऋत्य दिशा (रत्नागिरी - नागपूर महामार्ग) • ७० किमी पश्चिम दिशा (नांदेड - परभणी महामार्ग) • १९२ किमी ईशान्य दिशा (नांदेड - नागपूर महामार्ग) |
जवळचे शहर | अर्धापूर, मुदखेड, लोहा, वसमत, परभणी |
प्रांत | मराठवाडा |
विभाग | छत्रपती संभाजीनगर विभाग |
जिल्हा | नांदेड जिल्हा |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता |
५,५०,४३९ (८०) (२०११) • ८,७००/किमी२ ९४२ ♂/♀ ६५ % |
भाषा | मराठी |
महापौर | रिक्त (अंतिम-श्रीमती पावडे) |
आयुक्त | सुनील लहाने (IAS) |
आमदार | • बालाजी कल्याणकर(ना. उ.), • मोहनराव हंबर्डे (ना. द.) |
विधानसभा (जागा) | महाराष्ट्र विधानसभा (६) |
संसदीय मतदारसंघ | नांदेड |
तहसील | नांदेड तालुका |
महानगरपालिका | नांदेड-वाघाळा महानगरपालिका |
जिल्हा परिषद | नांदेड जिल्हा परिषद |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१६०१ ते ४३१६०५ • +०२४६२ • MH - 26 |
संकेतस्थळ: |
नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे.