यवतमाळ
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर. From Wikipedia, the free encyclopedia
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर. From Wikipedia, the free encyclopedia
यवतमाळ शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. त्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर (cotton city) म्हणले जाते.येथे जवळच लोहारा येथे एमआयडीसी (महाराष्ट् इंडस्ट्रियल काॅरपोरेशनने बनवलेली औद्योगिक व्यावसायिकांची उद्योग-वसाहत) आहे.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
स्थान | यवतमाळ जिल्हा, अमरावती विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
|
यवतमाळ शहराचे पूर्वीचे नाव यवत किंवा यवती , योतमाड असे होते . आजूबाजूला दाट व उंच झाडांची दाटी असल्यामुळे याला योतमाड असे नाव पडले होते . नंतर याला यवतमाळ म्हणजे माळावर वसले असल्या मुळे यवतमाळ म्हणायला सुरुवात झाली . यवतमाळ हे बेरार सल्तनतेचे मुख्य शहर होते आणि जुन्या लिखाणांनुसार "जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण" होते. यवतमाळ (सध्या यवतमाळ जिल्हा) नंतरचा प्रदेश, अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या राजवटीत १३४७ मध्ये बहमनी सल्तनतीची स्थापना केली. १५७२ साली, अहमदनगर सल्तनत (वर्तमान दिवस अहमदनगर जिल्हा )चे शासक मुर्तजा शाह, यवतमाळ जिल्हा १५९६ मध्ये, अहमदनगरच्या योद्धा रानी चांद बीबीने यवतमाळ जिल्ह्याचे मुघल साम्राज्य, नंतर भारताच्या मोठ्या भागाचे राज्यकर्ते सोडले. १७०७ मध्ये सहाव्या मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर यवतमाळ हा मराठा साम्राज्यात गेला. १७८३ मध्ये जेव्हा रघोजी भोसले नागपूर साम्राज्याचे शासक झाले तेव्हा त्यांनी आपल्या क्षेत्रात यवतमाळ जिल्हाचा समावेश केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ मध्ये बेरार प्रांत उभारल्यानंतर १८६३ मध्ये यवतमाळ पूर्वेकडील बेरार जिल्हा बनला आणि नंतर दक्षिण पूर्व बेरार जिल्हा-मध्य प्रांत आणि बेरार या दोन्ही जिल्ह्यांचा भाग बनला. यवतमाळ १९५६ पर्यंत राज्य पुनर्रचना होईपर्यंत मध्य प्रदेशचा भाग राहिला.
ऐन -ई -अकबरी या प्राचीन ग्रंथात यवतमाळचा उल्लेख दिसून येतो . तसेच अकबरच्या दरबारात अबुल फाजल याच्या लेखकात यवतमाळ मधील योत लोहार या गावाचा उल्लेख पाहायला मिळतो . १९३० साली प्रसिद्ध झालेल्या केसरी प्रबोध या ग्रंथात यवत म्हणून यवतमाळचा उल्लेख मिळतो . १ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
यवतमाळात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यातली काही अशी :-
तसेच शहारात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नऊही दिवस शहरातील व आजुबाजुच्या खेड्यातील भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र ऊत्सवामध्ये भारतात कलकत्त्यानंतर यवतमाळ शहराचा दुसरा क्रमांक लागतो.
पर्यटन स्थळे
सहस्त्रकुंड धबधबा , टिपेश्वर अभयारण्य
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.