![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/26/Seal_of_Maharashtra.png/640px-Seal_of_Maharashtra.png&w=640&q=50)
महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह / From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/37/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%2C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_.jpg/320px-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%2C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88_.jpg)
महाराष्ट्र विधानसभा | |
---|---|
![]() | |
१४वी महाराष्ट्र विधानसभा | |
प्रकार | |
प्रकार | द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ |
इतिहास | |
नेते | |
अध्यक्ष |
राहुल नार्वेकर (०३ जुलै २०२२ पासून), भारतीय जनता पार्टी २०१९ |
उपध्यक्ष |
झिरवाळ नरहरी सिताराम (०९ मार्च २०२० पासून), एनसीपी २०१९ |
सभागृह नेता |
एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री), शिवसेना २०१९ |
सभागृह उप नेता |
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, (उप मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रवादी २०१९ |
विरोधी पक्षनेता |
विजय वडेट्टीवार, काँग्रेस २०१९ |
उप विरोधी पक्षनेता |
बाळासाहेब थोरात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
संरचना | |
सदस्य | २८८ |
राजकीय गट |
भाजप (१०४) ]]राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार]](१२) |
निवडणूक | |
मागील निवडणूक | १५ ऑक्टोबर २०१४ |
बैठक ठिकाण | |
Vidhan_bhavan_mumbai2.JPG | |
मुंबई, नागपूर | |
संकेतस्थळ | |
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ | |
तळटिपा | |
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. ०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विघानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकार मध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.