अजित पवार
राजनेता / From Wikipedia, the free encyclopedia
अजित अनंतराव पवार (२२ जुलै १९५९) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत. २ जुलै २०२३ पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.[1] २०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे. [2]
अजित पवार | |
---|---|
![]() | |
जन्म |
अजित अनंतराव पवार २२ जुलै, १९५९ (1959-07-22) (वय: ६४) देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि.अहमदनगर |
निवासस्थान | सहयोग,बारामती,जि.पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | दादा |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बी.कॉम्. |
पेशा | राजकारण |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९८२ पासून |
मूळ गाव | काटेवाडी ता. बारामती जि. पुणे |
पदवी हुद्दा |
उपमुख्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य ) अध्यक्ष, एनसीपी |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष |
धर्म | हिंदू |
अपत्ये | पार्थ पवार, जय पवार |
वडील | अनंतराव पवार |
नातेवाईक | शरद पवार (काका), सुप्रिया सुळे (चुलत बहिण) |
ते १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.[3][4] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. [5][6]
२०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले. [7][8][9]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |