विजय वडेट्टीवार
एक भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
विजय नामदेवराव वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप व पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री होते.
जलद तथ्य राज्यपाल, राष्ट्रीयत्व ...
विजय वडेट्टीवार | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० सप्टेंबर २०२३ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
बंद करा
वडेट्टीवार हे माजी आमदार असून चिमूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेत झाली असून, नंतर त्यांनी नारायण राणे यांचेसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसच्या तिकिटावर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.[1][2][3] चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादनशुल्क मंत्री यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली.[4]