मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.
विसावे शतक
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
- १९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- १९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- १९३१ - न्यू यॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
- १९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्वात आले.
- १९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
- १९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
- १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
- १९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- १९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
- १९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
- १९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली
- १९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.
- १९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
- १९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार
- १९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
- १९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
- १२१८ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १९१३ - बलराज साहनी, हिंदी चित्रपट अभिनेता. (मृ. १९७३)
- १९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
- १९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
- १९२२ - मधु लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते. (मृ. १९९५)
- १९३२ - एस.एम. कृष्णा, कर्नाटकचे १६वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री,
- १९४३ - सोनल मानसिंह, भारतीय नृत्यांगना.
- १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
- १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - अनुष्का शर्मा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- ४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट.
- १३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा.
- १५७२ - पोप पायस पाचवा.
- १९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.
- १९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
- १९५८ - गणेश शिवराम उर्फ नाना जोग, मराठी नाटककार.
- १९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- १९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक.
- १९९३ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.
- १९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
- १९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- १९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
- २००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.