दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश From Wikipedia, the free encyclopedia
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया') हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात तिसरा मोठा देश आहे.[4] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
ब्राझील ब्राझीलिया | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso (सुव्यवस्था आणि प्रगती) | |||||
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
| |||||
ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | ब्राझीलिया | ||||
सर्वात मोठे शहर | साओ पाउलो | ||||
अधिकृत भाषा | पोर्तुगीज | ||||
सरकार | अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (पोर्तुगालपासून) सप्टेंबर ७, १८२२ (घोषित) ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) | ||||
- प्रजासत्ताक दिन | नोव्हेंबर १५, १८८९ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ८५,१४,८७७ किमी२ (५वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.६४ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | १९,२२,७२,८९०[1] (५वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २.०१३ निखर्व[2] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ०.८१३[3] (उच्च) (७५ वा) (२००8) | ||||
राष्ट्रीय चलन | ब्राझीलियन रिआल (BRL) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी -२ ते -५ | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BR | ||||
आंतरजाल प्रत्यय | .br | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५५ | ||||
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[5] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते. ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील' या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.
अक्षांश ५.१५o उ. ते ३३o.४५ द.
अक्षवृत्त ५.१५o हे रोराईमाला लागून जाते, तर ३३o.४५ द हे रिओ ग्रान्दे दो सुलला लागून जाते.
रेखांश विस्तार- 34o 45' प. हे रेखावृत्त परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवासला लागून जाते. 73o 48'प. हे रेखावृत्त आक्रेला लागून जाते.
ब्राझील देशामध्ये २6राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.
तीन शतके पोर्तुगीज राजवटीच्या प्रभावाने ब्राझील मध्ये कॅथोलिक धर्माच्या व्यक्ती बहुसंख्य आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनुसार ब्राझील ही जगातील ७वी मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलकडे मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ब्राझील ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. गेली १५० वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश आहे.
इतर दक्षिण अमेरिकन देशांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉल खेळाडू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले होते.
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेले रियो दि जानीरो हे यजमानपदाचा मान मिळवणारे दक्षिण अमेरिकेमधील सर्वप्रथम शहर असेल. साओ पाउलोमधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस रेसिंग ट्रॅकवर दरवर्षी ब्राझीलियन ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.