मध्य युरोपातील एक देश From Wikipedia, the free encyclopedia
झेकीया (चेक: Česko, उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झेकीयाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही झेकीयाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
झेकीया Česko | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो) | |||||
राष्ट्रगीत: (अर्थ: माझे घर कुठे आहे?) | |||||
झेकीयाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
प्राग | ||||
अधिकृत भाषा | चेक | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | पेत्र पावेल | ||||
- पंतप्रधान | पेत्र नेचास | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- बोहेमियाची डुची | अं. ८७० | ||||
- बोहेमियाचे राजतंत्र | इ.स. ११९८ | ||||
- चेकोस्लोव्हाकिया | २८ ऑक्टोबर १९१८ | ||||
- चेक साम्यवादी गणराज्य | १ जानेवारी १९६९ | ||||
- चेकोस्लोव्हाकियाचे विघटन | १ जानेवारी १९९३ | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ मे २००४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ७८,८६६ किमी२ (११६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | २.० | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,०५,१३,२०९ (८१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १३४/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २८६.६७६ अब्ज[1] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २७,१६५ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८७३ (उच्च) (२८ वा) (२०१३) | ||||
राष्ट्रीय चलन | चेक कोरुना (CZK) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CZ | ||||
आंतरजाल प्रत्यय | .cz | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +४२० | ||||
१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व झेकीया आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले. २०१६ पर्यंत ह्या देशाला चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखले जात होते
नाव | वस्ती[2] | क्षेत्रफळ (किमी²) | प्रांत |
---|---|---|---|
प्राग (प्राहा) | ११,८१,६१० | ४९६496 | प्राग प्रांत |
ब्रनो | ३,६६,७५७ | २३० | दक्षिण मोराव्हिया |
ओस्ट्राव्हा | ३,१०,०७८ | २१४ | मोराव्हिया-सिलेसिया |
प्लझेन | १,६२,७५९ | १३८ | प्लझेन प्रांत |
ओलोमुक | १,००,३८१ | १०३ | ओलोमुक प्रांत |
झेकीयामधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.
जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे झेकीयामध्ये बहुतांश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणाऱ्यांचा समावेश आहे. झेकीयामधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.
येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्वात नाही.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.