स्फुरद
From Wikipedia, the free encyclopedia
स्फुरद (इंग्रजी नाव - फॉस्फरस, संज्ञा P, अणुक्रमांक १५) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. फॉस म्हणजे प्रकाश आणि फोरोस म्हणजे देणारा या ग्रीक भाषेतील शब्दांवरून फॉस्फरस या नावाची व्युत्पत्ती झाली. पांढरा फॉस्फरस हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आला असता मंद प्रकाश देतो म्हणून त्याला फॉस्फरस असे नाव दिले गेले.[१] आधुनिक काळात शोधलेले फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आहे. जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेनिग ब्राण्ड याने फॉस्फरसचा शोध लावला. जर्मनीतल्या हॅम्बुर्ग शहरात १६६९ साली फॉस्फरस वेगळा करण्यात यश मिळाले. असे असले तरी फॉस्फरस हे एक मूलद्रव्य आहे हे फ्रेंच शास्त्रज्ञ अँटोनी लॅवोझिएने इ.स. १७७७ साली सिद्ध केले.[२]
![]() स्फुरदाची विविध रूपे | ||||||||
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
अपरूप | पांढरा / पिवळसर पांढरा, लाल, काळा | |||||||
दृश्यरूप | विविध रंगी (मुख्यत्त्वे मेणचट पांढरा-पिवळा, आणि लाल) घन | |||||||
साधारण अणुभार (Ar, standard) | ३०.९७३ ग्रॅ/मोल | |||||||
स्फुरद (फॉस्फरस) - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | १५ | |||||||
गण | पंधरावा गण (Pnictogens) | |||||||
आवर्तन | ३ | |||||||
श्रेणी | अधातू | |||||||
विजाणूंची रचना | [Ne] ३s२ ३p३ | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
स्थिती at STP | घन | |||||||
घनता (at STP) | १.८२३ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.