From Wikipedia, the free encyclopedia
माणदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे.या भागात माण नावाची वैशिष्ट्यपूर्ण चिकणमाती आढळते. माणदेशाव्यतिरिक्त ही माती इतरत्र सापडत नाही. या भागातून माण नदी वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात. माणदेश च्या मातीतील लेखक जयराम शिंदे यांची अनेक प्रकारची पुस्तके माणदेश प्रकाशन स्वरूपात आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून. लेखक जयराम शिंदे यांनी माणदेश प्रकाशन मधून सातारा जिल्हा माहिती पुस्तक संपादित केले असून त्यात माणदेशची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे
माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.
मराठी साहित्यिक ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या बंधूंचे बालपण माणदेशातील माडगूळ गावी गेले. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेल्या माणदेशी माणसे या पुस्तकात या परिसरातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. शंकरराव खरात हे माणदेशातील थोर साहित्यिक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.शंकरराव खरातांचे तराळअंतराळ हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.
शिखर शिंगणापूर,भोजलिंगगड,खरसुंडी,करगणी,मोही, दिवड,म्हसवड,पिंगळी,सीताबाई,मलवडी आणि गोंदवले ही माणदेशातील प्रसिद्ध देवस्थाने आहेत.
• बरिकराव = छोटा दीर • माय = सर्वात छोटी चुलती
• परडा = गोठा
• अदमाशी = अर्धवट
• कुमाट = कुजका
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.