Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
भाषा संचालनालय हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील एक कार्यालय असून राज्याच्या राजभाषा मराठी विषयक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम करते. सन २०१०मध्ये स्थापन झालेल्या मराठी भाषा विभागाच्या नियंत्रणाधीन सध्या हे कार्यालय असून या कार्यालयाने आजपर्यंत मराठी भाषेबाबत मोलाची भूमिका पार पाडली आहे.शासकीय कामकाजात मराठीचा वापर होण्यासाठी प्रथम पदनाम कोश प्रकाशित करण्यात आला ,जेणेकरून सर्व शासकीय पदनामे मराठीमध्ये यावीत.आज आपल्याला शासकीय पदनामे मराठीत दिसतात.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
त्यानंतर प्रशासन वाक्प्रयोग, कार्यदर्शिका ही प्रकाशने तर शासकीय पत्रव्यवहार, टिपण्या,इ. सुटसुटीत भाषेत असाव्यात म्हणून `प्रशासनिक लेखन' हे पुस्तक प्रसिद्ध झाल. दुसरा टप्पा म्हणजे विद्यापीठांमधून शिक्षणाचे माध्यम मराठी असावे याकरिता विविध विषयांचे परिभाषा कोशतयार झाले. त्यांत आता भर घालण्याचे काम वेगात सुरू आहे आणि तिसरा टप्पा न्यायालयात मराठी भाषेचा वापर होण्यासाठी न्याय व्यवहार कोश प्रकाशित करण्यात आला आहे.
स्थूलमानाने भाषा संचालनालयातील कामकाजाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल:- १.राजभाषा मराठीविषयक शासनाचे धोरण राबवणे. २.प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शक पुस्तिका तयार करणे. ३.महाविद्यालयीन अभ्यासासाठी शास्रीय व तांत्रिक परिभाषा कोश तयार करणे. ४.विधिविषयक अनुवाद व परिभाषा तयार करणे. ५.अर्थसंकल्पीय तसेच प्रशासनिक व विभागीय नियमपुस्तकांचा अनुवाद करणे. ६.अमराठी कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी मराठी भाषा प्रशिक्षण व परीक्षा आयोजित करणे. ७.अ)हिंदी भाषा परीक्षा आयोजित करणे. ब)महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयात त्रिभाषा सूत्राचा वापर करणे. ८.इंग्रजी टंकलेखक व लघुलेखक यांच्यासाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण आणि परीक्षा आयोजित करणे. ९.अल्पसंख्यांकांच्या भाषांतून अनुवाद करणे. १०. शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा दृष्टीने कार्यालयांची तपासणी व त्यांना मार्गदर्शन करणे.
इ.स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ.स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठीसुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते. या अनुरोधाने महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांची एक संयुक्त बैठक होऊन त्यात पदव्युत्तर स्तरापर्यंत शास्त्रीय व तांत्रिक विषय धरून सर्व विषयांची परिभाषा शासनाने तयार करावी असे ठरले. या निर्णयानुसार शास्त्रीय मराठी परिभाषा विकसित करण्याच्या प्रयोजनार्थ भाषा संचालनालयाने शास्त्रीय व तांत्रिक विद्याशाखांतील निरनिराळ्या विषयांच्या उपसमित्या स्थापन करून त्यांच्या साहाय्याने अजूनपर्यंत सुमारे ४५ परिभाषा कोश प्रकाशित केले आहेत. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, लोकप्रशासन, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यशास्त्र, वृत्तपत्रविद्या भाषाविज्ञान व वाङमयविद्या अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे.
या परिभाषा कोशांच्या निर्मितीसाठी एका उपसमितीची स्थापना करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे व मराठी विज्ञान परिषदेचे प्रतिनिधी यांची मिळून ही उपसमिती बनलेली असते. विद्यापीठांचे प्रतिनिधी हे संबंधित विषय विद्यापीठांत किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवत असतात. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा सतत संपर्क असतो. त्यामुळे एखादा विषय शिकविताना प्रत्यक्षात काय अडचणी असतात याची त्यांना कल्पना असते. त्यांचे ज्ञानही अद्ययावत असते. परिभाषा निर्मितीचे काम बरेचसे जिकिरीचे व बौधिक स्वरूपाचे असते. परिभाषा निर्मितीच्या कामात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे सक्रिय सहभागी होत असल्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्रातील सर्व प्रदेशाचे प्रतिनिधित्व होते.
परिभाषा निर्मितीच्या कामात निव्वळ विषयाचे ज्ञान असून चालत नाही. दर या ज्ञानाच्या जोडीला भाषिक समस्यांकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी आवश्यक असते व म्हणून व्याकरणशुद्ध परिभाषा घडविण्यासाठी एका भाषा संस्कृत तज्ज्ञांची देखील या उपसमितीवर नेमणूक करण्यात येते. ज्याप्रमाणे आंधळ्यांच्या पाठीवर लंगडा बसला की लंगडा वाट दाखवितो व आंधळा त्याला पाठुंगळीस घेऊन वाटचाल करतो त्याप्रमाणे विषयतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ हे दोघे एकमेकांच्या सहकार्याने परिभाषा निर्मितीचे काम करतात.
भाषा सल्लागार मंडळाने तयार केलेली निदेशक तत्त्वे यांच्या साहाय्याने उपसमितीचे कामकाज चालते.
उपसमिती स्थापन झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीमध्ये उपस्थित प्रतिनिधींमधून सर्वसंमतीने अध्यक्षांची निवड करण्यात येते. भाषा संचालक अगर त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी सदर उपसमितीचा सदस्य-सचिव म्हणून काम पाहतो. अध्यक्ष प्रत्येक सदस्याला त्या-त्या विषयातील पोटविषय वाटून देतात. पारिभाषिक संज्ञामध्ये catalyst, enzyme, valency, nucleus, parabola ह्यांसारखे शुद्ध पारिभाषिक शब्द affinity, critical, function, set, neighbourhood ह्यांसारखे अर्धपारिभाषिक शब्द आणि या शब्दांचा परिभाषेत वापर होत असताना प्रयुक्त होणारे form, glass, map, machine, transfer ह्यांसारखे सामान्य शब्दसुद्धा अंतर्भूत होतात. सदस्यांनी पुरविलेल्या पारिभाषिक संज्ञांवर बैठकीमध्ये साधक-बाधक चर्चा होऊन पर्याय निश्चितीचे काम केले जाते. प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे लागते. संबधित विषयातील तज्ज्ञ, सदस्य पारिभाषिक शब्द नव्याने घडवितात. नव्याने शब्द निर्माण करण्याच्या (coining) ह्या प्रक्रियेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेला प्रतिशब्द भाषिक कसोटीवर तपासून पाहण्याचे काम संस्कृततज्ज्ञ किंवा भाषातज्ज्ञ करतात.
परिभाषा निश्चित करताना कधी-कधी दुसऱ्या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. उदा० लिटर, मीटर, केबल, प्रोटॉन, न्यूट्रॉन इ० कधी दुसऱ्या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना मराठीची प्रत्यय प्रक्रिया लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ० आंतरराष्टीय स्वरूपाच्या सर्व संज्ञा, मूलद्रव्ये, संयुगे वगैरेंची नावे त्यांच्या इंग्रजी स्वरूपातच जशीच्या तशी लिप्यंतरित केली जातात.
शासन शब्दकोश भ्रमणध्वनी उपयोजक
इंग्रजी शब्दांना राजभाषा मराठीतले अधिकृत पर्याय देणारे भ्रमणध्वनी उपयोजक (Android Application) दिनांक २७/०२/२०१८ रोजी राजभाषा मराठी दिनाच्या निमित्ताने,भाषा संचालनालय,मराठी भाषा विभागाने गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे.हे ॲॅॅॅप्लिकेशन एकदा स्थापित झाल्यावर इंंटरनेट जोडणीशिवाय देेेेखील मोबाईलवर वापरता येेेेते. संक्षिप्त शेऱ्यांची लघुपुस्तिका प्रशासकीय कामकाजामध्ये कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी,अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या फाईलींवर वरिष्ठांकडून शेरे लिहिले जात असतात.असे शेरे मराठीमध्ये नेमक्या शब्दात व स्वरूपात लिहिणे आवश्यक असते. तथापि, बरेचदा हे शेरे सहजपणे इंग्रजीत लिहिले जातात. अशा सहजपणे व वारंवार लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी शेऱ्यांना मराठी पर्याय उपलब्ध असलेली एक लघुपुस्तिका अधिकाऱ्यांच्या हाताशी असावी असा मानस होता. या उद्देशाने संक्षिप्त शेऱ्यांची ही लघुपुस्तिका तयार करण्यात आली आहे.
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे अंतर्गत अनेक कोश्याचे काम केले जाते शासन व्यवहारात मराठीच सक्षम आणि सुलभ पद्धतीने वापर व्हावा यासाठी अनेक आवश्यक पुस्तके आणि कोश्यांची निर्मिती केली जाते त्या पैकी आपण आज "प्रशासनिक लेखन" या विषयी माहिती पाहू
" प्रशासनिक लेखन" मराठीकरण्याच्या पूर्वतयारी साठी भाषा सल्लागार मंडळाच्या बहुमोल मार्गदर्शन खाली भाषा संचालनालयाने जी महत्त्वाची प्रकाशाने प्रसिद्ध केली त्या पैकी प्रस्तुत प्रशासनिक लेखन हे पुस्तक अनेक दृष्टीने उपयुक्त ठरेल.
हे पुस्तक मुख्यतः कार्यालयीन कामकाजाचे स्वरूप समजावून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
शासकीय पत्र व्यवहार, टिप्पण्या, शासकीय निर्णीय, परिपत्रके, प्रसिद्धीपत्रके इत्यादींचे काही निवडक नमुने यात संकलित केले आहेत. मूळ इंग्रजी नमुने व त्यांची मराठी रूपे एकत्र दिलेली असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मराठीतून लेखन व्यवहारात कसा करावा याचा बोध होईल
या सोबतच काही स्वतंत्र प्रकरणे मूळ मराठीतूनहि विस्ताराने दिलेली आहेत.इंग्रजीचा आधार न घेता मराठीतून ती कशी निकालात काढावी व त्या संबंधीचा पत्र व्यवहार करावा याची रूपरेषा त्यावरून कळून येईल
प्रस्तुत पुस्तक वाचताना अनेक कर्मचाऱ्यांना थोडे अडखळल्यासारखे होईल. व्यवहारात आपण नेहमी जी भाषा बोलतो, वापरतो त्यापेक्षा ही भाषा काहीशी भिन्न असल्याचे जाणवेल.नित्याचा व्यवहारात आम्ही वापरीत असलेल्या शब्दसंग्रह तोडका असतो व सामान्य व्यवहारात वगळून कार्यालयीन बाबीसंबंधी आम्ही जेंव्हा बोलतो तेव्हा प्रायः नामे सर्वनामे व क्रियापदेच फक्त मराठी वापरतो. इतर विचार व्यक्त करण्यासाठी इंग्रजीचा वापर करतो
डॉ. वा.ना. पंडित, श्री न.ब. पाटील, श्री य.शं. कानिटकर, मंजूषा कुलकर्णी, हर्षवर्धन जाधव
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.