Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विज्ञान परिषदेची स्थापना इ.स. १९६६ साली झाली. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कार्य करीत असलेल्या या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत चुनाभट्टी येथे आहे.[१] मध्यवर्तीशी संस्थेशी संलग्न विभागांशी संख्या एकूण ६८ इतकी आहे. हे सर्व विभाग महाराष्ट्रभर विखुरले असून महाराष्ट्राबाहेरही परिषदेचे ४ विभाग कार्यरत आहेत.
अशाच उद्देशाने कलकत्यात १९१३ साली ’भारतीय विज्ञान परिषद संस्था’ स्थापन झाली आहे. मराठी विज्ञान परिषद या संस्थेहून निराळी आहे.
१. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे. २. विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे. ३. विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे. ४. वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे[२]
वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, मासिक विज्ञान गप्पांचा कार्यक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरूकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक चालवणे, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन करणे असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात.
मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.
मराठी विज्ञान परिषदेला भारत सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, तसेच इचलकरंजीचे फाय फाउंडेशन यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) चिंचणी-तारापूर, ६) बोर्डी, ७) रोहा, ८) रत्नागिरी, ९) नारिंग्रे
१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) बारामती, ५) अहमदनगर, ६) कराड, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर
मराठीतून आधुनिक विज्ञानाचा प्रसार करणे या हेतूने १९६७ साली मराठी विज्ञान परिषद (पुणे विभाग) ह्या संस्थेची स्थापना झाली.
१) धुळे, २) चाळीसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक
१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) हिंगोली, ९) उस्मानाबाद, १०) नळदुर्ग, ११) उमरी, १२) माजलगांव
१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशीम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया
१) बडोदा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.