Remove ads
अणु क्रमांक ७ असलेले वायुरूप रासायनिक द्रव्य From Wikipedia, the free encyclopedia
नत्रवायू किंवा नत्र: नत्रवायू हा वातावरणात कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पसरलेला आहे. नत्राचा उपयोग हा सजीवांना थेट नसला, तरी सजीवांच्या वाढीसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण वायू आहे. नत्र (N, अणुक्रमांक ७) हे वायुरूप अधातू मूलद्रव्य आहे. कक्ष तापमानाला ह्या वायूचे रेणू हे विस्कळीत असतात आणि हा वायू रंगहीन व गंधहीन असतो. नत्र हे विश्वात सर्वसामान्यपणे आढळणारे एक मूलद्रव्य आहे, तसेच आपली आकाशगंगा आणि सूर्यमालेतील अंदाजे सातवा भाग नत्राने व्यापलेला आहे. पृथ्वीवर हे वायूरूपात आढळते. याने पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे ७८% भाग व्यापलेला आहे. हवेतील संयुगांना विघटीत करण्यासाठी स्कॉटीश भौतिकतज्ञ डॅनियल रुदरफॉर्ड यांनी इ.स.१७६२ साली नत्राचा शोध लावला.
रंगहीन वायू, द्रव आणि घनरूप | ||||||||
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
दृश्यरूप | रंगहीन वायू, द्रव आणि घनरूप | |||||||
साधारण अणुभार (Ar, standard) | १४ ग्रॅ/मोल | |||||||
नत्र - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | ७ | |||||||
गण | पंधरावा गण (Pnictogens) | |||||||
श्रेणी | अधातू | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
स्थिती at STP | वायू | |||||||
विलयबिंदू | ६३.१५ °K (-२१०.०० °C, -३४६.०० °F) | |||||||
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | ७७.३६ °K (-१९५.७९ °C, -३२०.३३ °F) | |||||||
घनता (at STP) | १.२५१ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.