महाराष्ट्र शासन
भारतातील राज्य सरकार / From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. हे एक लोकशाही पद्धतीने निवडून चालणारे सरकार आहे, ज्यामध्ये दर ५ वर्षांनी २८८ आमदार विधानसभेवर निवडून जातात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत विधानसभा (कनिष्ट सभागृह) आणि विधान परिषद (वरिष्ट सभागृह). महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७८ आमदार आहेत, त्यापैकी ६६ आमदार हे निवडून तर १२ आमदार नामनिर्देशित असतात.[1] भारताच्या संसदीय व्यवस्थेप्रमाणेच कनिष्ट सभागृहात म्हणजेच विधानसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांचा गटच सरकार स्थापन करु शकतो. विधानसभेत बहुमताचे नेतृत्व करणारा नेताच मुख्यमंत्री बनतो आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यामधून मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाते आणि विविध मंत्रालयाचा कारोभार या मंत्र्यांकडे सोपवला जातो. निवडून न आलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यास, त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहात निवडून येणे बंधनकारक असते.[2] भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो.[3] एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.[4]
महाराष्ट्राचे राज्यचिन्ह | |
स्थापना | 1 मे 1960; 64 वर्षां पूर्वी (1960-०५-01) |
---|---|
देश | भारतीय गणराज्य |
संकेतस्थळ |
maharashtra |
स्थान | राज्यभवन, मुंबई |
विधिमंडळ | |
विधिमंडळ | महाराष्ट्र विधिमंडळ |
वरिष्ठ सभागृह | महाराष्ट्र विधान परिषद |
सभापती | नीलम गोऱ्हे (शिवसेना-शिंदे) (अतिरिक्त जबाबदारी) |
उपसभापती | नीलम गोऱ्हे (शिवसेना-शिंदे) |
सभागृह नेते |
देवेंद्र फडणवीस (भाजप) (महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री) |
सभागृह उपनेते | उदय सामंत (शिवसेना-शिंदे) (कार्यवाहू) |
विरोधी पक्षनेते | अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे) |
उप विरोधी पक्षनेते | भाई जगताप (राष्ट्रीय काँग्रेस) |
कनिष्ठ सभागृह | महाराष्ट्र विधानसभा |
अध्यक्ष | राहुल नार्वेकर (भाजप) |
उपाध्यक्ष | नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी-अजित पवार) |
सभागृह नेते |
एकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे) (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) |
सभागृह उपनेते | |
विरोधी पक्षनेते | विजय नामदेवराव वडेट्टीवार (राष्ट्रीय काँग्रेस) |
उप विरोधी पक्षनेते | |
बैठक स्थान | विधिमंडळ |
कार्यकारी | |
राज्यप्रमुख |
रमेश बैस (भाजप) (महाराष्ट्राचे राज्यपाल) |
शासनप्रमुख |
एकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे) (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) |
शासन उपप्रमुख | |
नागरी सेवा प्रमुख |
डॉ. नितीन करीर भाप्रसे (महाराष्ट्राचे मुख्य सचिव) |
राज्य मंत्रिमंडळ | एकनाथ शिंदे मंत्रीमंडळ |
मंत्रालय (शासन विभाग) | 68 |
बैठक स्थान | मंत्रालय, मुंबई |
मंत्री सदस्यांची एकूण संख्या |
|
याला उत्तरदायी | महाराष्ट्र विधानसभा |
न्यायमंडळ | |
न्यायालय | मुंबई उच्च न्यायालय |
सरन्यायाधिश | देवेंद्र कुमार उपाध्याय |