आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.

आमदाराचा कालावधी

विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.आमदार होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही २५ वर्ष असणे आवश्यक असते.

आमदारांची आकडेवारी

सध्या उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक ४०३ आमदार आहेत.तसेच सिक्कीम राज्यातील विधानसभेत सर्वात कमी ३२ आमदार आहेत.संपूर्ण भारत देशात सध्या ४१२३ आमदार आहेत.

भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आमदारांची संख्या

अधिक माहिती राज्य, विधानसभा आमदारांची संख्या ...
राज्यविधानसभा आमदारांची संख्या विधानपरिषद आमदारांची संख्या
अंदमान आणि निकोबार लागू नाही लागू नाही
आंध्र प्रदेश१७५ ५८
अरुणाचल प्रदेश६० लागू नाही
आसाम१२६ लागू नाही
छत्तीसगड९० लागू नाही
बिहार२४३ ७५
चंदिगढ लागू नाही लागू नाही
दादरा आणि नगर-हवेली लागू नाही लागू नाही
दमण आणि दीव लागू नाही लागू नाही
गोवा४० लागू नाही
गुजरात१८२ लागू नाही
हरियाणा९० लागू नाही
हिमाचल प्रदेश६८ लागू नाही
जम्मू काश्मीर९० लागू नाही
झारखंड८१ लागू नाही
कर्नाटक२२४ ७५
केरळ१४० लागू नाही
लक्षद्वीप लागू नाही
मध्यप्रदेश२३० लागू नाही
महाराष्ट्र२८८ ७८
मणिपूर६० लागू नाही
मेघालय६० लागू नाही
मिझोरम४० लागू नाही
नागालॅंड६० लागू नाही
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली ७० लागू नाही
ओरिसा१४७ लागू नाही
पुदुच्चेरी ३३ लागू नाही
पंजाब११७ लागू नाही
राजस्थान२०० लागू नाही
सिक्कीम३२ लागू नाही
तमिळनाडू२३४ लागू नाही
तेलंगणा११९ ४०
त्रिपुरा६० लागू नाही
उत्तरप्रदेश४०३ १००
उत्तराखंड७० लागू नाही
पश्चिम बंगाल२९४ लागू नाही
बंद करा


संदर्भयादी

१.https://en.m.wikipedia.org/wiki/Uttar_Pradesh_Legislative_Assembly २.https://en.m.wikipedia.org/wiki/State_legislative_assemblies_of_India

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.