अरुणाचल प्रदेश
भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य From Wikipedia, the free encyclopedia
भारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य From Wikipedia, the free encyclopedia
अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे.[१] हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.[२] या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.
?अरुणाचल प्रदेश भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ८३,७४३ चौ. किमी |
राजधानी | इटानगर |
मोठे शहर | इटानगर |
जिल्हे | १७ |
लोकसंख्या • घनता |
१३,८२,६११ (२६ वे) (इ.स. २०११) • १७/किमी२ |
भाषा | इंग्रजी, हिंदी |
राज्यपाल | बी डी मिश्रा |
मुख्यमंत्री | प्रेमा खंडु |
स्थापित | २० फेब्रुवारी १९८७ |
विधानसभा (जागा) | Unicameral (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AR |
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ |
इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.[३] अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[४]
आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य इ.स. १९८७ साली स्थापन झाले.[५]
अरुणाचलच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत. अरुणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरुणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरुणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरुणाचलमधील प्रमुख पिके आहेत. अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.
यावरील विस्तृत लेख येथे आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.
२६ जानेवारी २०१६ रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशावर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. मात्र राष्ट्रपती राजवट मागे घेऊन तेथे पुन्हा काँग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यात ९ डिसेंबर २०१५ रोजी राज्यपालांनी काढलेले सर्व आदेश व निर्णय रद्दबातल केले.
येथील जनजाती आणि त्यांचा आहार याचा प्रभाव अरुणाचल प्रदेशावर दिसून येतो. अपांग म्हणजे तांदळापासून तयार केलेले मद्य हे येथील पेय आहे. विविध चवींचे हे पेय या प्रदेशात लोकप्रिय आहे.[६]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.