![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9c/Visualisation_1_million.svg/langmr-640px-Visualisation_1_million.svg.png&w=640&q=50)
१०,००,००० (संख्या)
From Wikipedia, the free encyclopedia
१०,००,००० - दहा लाख ही एक संख्या आहे, ती ९९९९९९ नंतरची आणि १०००००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 1000000 - Ten lakhs, One million . दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9c/Visualisation_1_million.svg/320px-Visualisation_1_million.svg.png)
- हेसुद्धा पाहा: कोटी
मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख.