स्पाईसजेट ही भारतामधील सन समूहाची स्वस्त दरात वैमानिक वाहतूक देणारी कंपनी आहे.[1] चेन्नई, तामिळनाडू येथे या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे आणि गुरगांव, हरयाणा येथे वाणिज्यिक कार्यालय आहे.[2] मे २००५ पासून विमानसेवा देण्यास सुरुवात करणा-या या कंपनीने २०१२ पर्यंत, भारतातील व्यापारी बाजारपेठ काबीज कुरून एर इंडिया, किंगफिशर एरलाईन्स आणि गोएरनंतर तिसरा क्रमांक पटकावलेला आहे.[3] फक्त एका प्रवाशाला विमानाने प्रवास करण्याची संधी स्पाईसजेटमुळे मिळालेली आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूकीचे काम स्पाईसजेट करते. अहमदाबाद, आगरताळा, अमृतसर, बगदोगरा, बेंगळुरू, चेन्नई, कोईमतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जबलपूर, कोची, कलकत्ता, मदुराई, मुंबई, पुणे, विशाखापट्टण, तिरुंचिरापल्ली, तूतिकोरीन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय शहरांवरून या कंपनीची विमाने उड्डाण करतात. प्रत्येक विमानामध्ये प्रवाशांव्यतिरिक्त २ ते ३.५ टन माल वाहून नेउुन विमानाची संपूर्ण क्षमता वापरलेली जाते.[4]
जलद तथ्य आय.ए.टी.ए. SG, आय.सी.ए.ओ. SEJ ...
बंद करा