आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना
एअरलाइन्ससाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना / From Wikipedia, the free encyclopedia
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (इंग्लिश: International Air Transport Association; संक्षेप: आय.ए.टी.ए., IATA) ही कॅनडाच्या मॉंत्रियाल येथे स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे. जगातील विमान उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. सध्या १२६ देशांमधील २४३ विमान कंपन्या ह्या संघटनेच्या सदस्य आहेत.