From Wikipedia, the free encyclopedia
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | |
Ministry अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र | महाराष्ट्र शासन |
मुख्यालय |
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई |
वार्षिक अंदाजपत्रक | महाराष्ट्र शासन नियोजन |
जबाबदार मंत्री |
|
संकेतस्थळ | सार्वजनिक बांधकाम मंत्रालय |
खाते |
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[1][2]
महाराष्ट्रचे सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासन Minister Public Works (Including Public Undertakings) of Maharashtra | |
---|---|
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | सार्वजनिक बांधकाम मंत्री |
सदस्यता |
|
निवास | वर्षा निवास, मुंबई |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई |
नामांकन कर्ता | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी |
सुभाष देसाई प्रभारी (२०२२ - २०२२) |
निर्मिती | १ मे १९६० |
पहिले पदधारक | मारोतराव कन्नमवार (१९६०-१९६२) |
उपाधिकारी | 29 जून 2022 पासून रिक्त |
या विभागास सुमारे १५० वर्षांचा इतिहास आहे.या विभागाकडे मुख्यत: रस्याचे बांधकाम व देखरेख/सुचालन, पुलांची बांधणी व शासकीय ईमारती हे काम आहे. हे खाते महाराष्ट्र शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते. फार पूर्वी, पाटबंधारे, रस्ते व पुल तसेच सार्वजनिक ईमारतींचे बांधकामही या विभागाकडे होते.सन १९६० मध्ये जेंव्हा वेगळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यानंतर या विभागाचे दोन विभागांमध्ये विभाजन करण्यात आले.पाटबंधारे विभाग आणि ईमारती व दळणवळण विभाग. सध्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग तसाच राहीला.[3]
शासनाचे नेमून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे करणे. शासकीय इमारतींचे बांधकाम, राज्यातील जनतेच्या सोयींसाठी रस्ते, पुल इत्यादिंचे निर्माण व त्यांचे सुचालन/देखरेख, वाहतूक निविघ्नपणे व सुरळीत रहावी या दृष्टीने बांधकामविषयक उपाययोजना, आकस्मिक आपत्ती जसे पूर, अतिवृष्टी, भूकंप इत्यादींमध्ये तातडीच्या उपाययोजना करणे.महाराष्ट्र शासन किंवा त्यांचे अखत्यारित असणाऱ्या कोणत्याही स्थानिक संस्थेने डिपॉझिट करून सोपविलेली कामे स्वीकारणे व पूर्ण करणे. रोजगार हमी योजने-अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करणे.अति-महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिपॅडचे बांधकाम करणे. खाजगी ईमारती शासनाच्या कार्यालयांसाठी हव्या असल्यास त्याचा किराया/भाडे निर्धारीत करणे.हवाई वाहतूकीसंबंधी धावपट्ट्यांचे आरेखन, बांधकाम,सुचालन व दुरुस्ती करणे. महत्त्वाच्या सार्वजनिक ईमारतींचे बाजूस किंवा सभोवताल बाग-बगीचे तयार करणे लँडस्केपींग[मराठी शब्द सुचवा] तयार करणे.शासकीय विश्रामगृहांचे आरक्षण करणे.रस्त्यांचे कडेस असणाऱ्या फळझाडांच्या फळांचा लिलाव करणे.रस्याचे कडेस झालेले अतिक्रमण हटविणे. सिनेमा रेल्युलेशन ॲक्ट प्रमाणे सार्वजनिक वावराच्या ईमारतींना (चित्रपटगृह) आवश्यक ते स्थिरता प्रमाणपत्र व त्यांचे विद्युतीकरण तपासून आवश्यक ते प्रमाणपत्र देणे.उद्वहन(लिफ्ट)साठी प्रमाणपत्र देणे. आवश्यक ते अहवाल शासनास पाठविणे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांची,महाराष्ट्र राज्याचे अधिनियमंची अंमलबजावणी करणे.इत्यादी.[4]
संपूर्ण महाराष्ट्र राज्य
प्रमुखत:, कामावर योग्य ते नियंत्रण रहावे म्हणून विकेंद्रीकरण व स्थानिक पातळीवर लक्ष देण्याचे अनुषंगाने व प्रशासकिय दृष्टीकोनातून याचे खालील विभाग करण्यात आलेले आहेत. या सर्व क्षेत्रांचे प्रमुख 'मुख्य अभियंता' हे असतात:
इंग्रजी:
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.