गोपीनाथ मुंडे
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
गोपीनाथ पांडुरंग मुंडे (१२ डिसेंबर, १९४९ - ३ जून, २०१४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते. त्यांनी इ.स. १९८० पासून इ.स. २००९ पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते.[1][2] भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांना भाजपमधील खालच्या स्तरापासून काम करणारा नेता समजले जाते. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून मुंडेची ओळख होतीे. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होतीे. [3][4][5][6][7][8] मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनायक असा गौरव केला होता.[9][10][11][12] [13][14]
गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे | |
कार्यकाळ ऑक्टोबर इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मागील | जयसिंगराव गायकवाड पाटील |
---|---|
पुढील | डॉ. प्रीतम मुंडे-खाडे |
मतदारसंघ | परळी विधानसभा मतदारसंघ |
कार्यकाळ इ.स. १९९५, १४ मार्च – इ.स. १९९९ | |
पुढील | छगन भुजबळ |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. १९९९ | |
जन्म | १२ डिसेंबर १९४९ (1949-12-12) नाथ्रा, ता. परळी, जि. बीड, महाराष्ट्र |
मृत्यू | ३ जून, २०१४ (वय ६४) दिल्ली |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | प्रज्ञा मुंडे |
अपत्ये | पंकजा मुंडे-पालवे, प्रीतम मुंडे-खाडे, यशश्री मुंडे |
निवास | परळी: यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड मुंबई:१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, वरळी,मुंबई |
व्यवसाय | राजकारण |
धर्म | हिंदू |
संकेतस्थळ | http://www.gopinathmunde.com/ |