भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर. From Wikipedia, the free encyclopedia
इंदूर हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर हे मध्य प्रदेशाच्या भोपाळ ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे. हे शहर इंदूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इंदूरला येतात. इंदूर हे शहर बरेच पुरातन आहे. पहिल्या बाजीरावांसोबत मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा माळवा या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी मल्हारराव होळकर यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव हे युद्धात वीरगती प्राप्त झाल्यावर त्यांच्या सुनेने - महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्यादेेवींचा महेश्वरचा राजवाडा अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
इंदूर | |
भारतामधील शहर | |
होळकर राजवाडा |
|
गुणक: 22°43′0″N 75°50′50″E |
|
देश | भारत |
राज्य | मध्य प्रदेश |
जिल्हा | इंदूर जिल्हा |
क्षेत्रफळ | ३८९.८ चौ. किमी (१५०.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,८१४ फूट (५५३ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २१,६०,६३१ |
- घनता | ८४१ /चौ. किमी (२,१८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
होळकरांचा राजवाडा इंदूरच्या मध्यात उभा आहे. इंदूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम. इंदूर एक औद्योगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.
इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे अशा दोन भागांत आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंद झाल्यावर त्यासमोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन्न भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
यशवन्त क्लब[1] (इन्दूरचे कै. महाराजा यशवन्तराव द्वितीय [2] होळकर यांच्या नावावर) आणि सयाजी क्लब / हॉटेल (स्व. महाराजा सयाजीराव (तिसरा) गायकवाड यांचे नाव बडोद्याचे गायकवाड) हे कला आणि संगीतासाठी मोठे प्रायोजक आहेत आणि जगभरातील प्रतिभांना आमंत्रित करतात. देवळालीकर कला विठिका, रविन्द्र नाट्य ग्रह (आरएनजी), माई मंगेशकर सभा गृृह, आनन्द मोहन माथुर सभागृह, डीएव्हीव्ही सभागृह आणि ब्रिलिएंट कन्व्हेन्शन सेंटर इन्दूरमधील प्रमुख कला केन्द्र आहेत.
शहरात चांगली वाढणारी रॉक / मेटल संगीत संस्कृती आहे. शहराच्या प्रारंभीच्या आणि प्रख्यात बॅंडपैकी एक असलेल्या निकोटीन, मध्य भारतात धातू संगीताचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध आहे.
देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदूरपासून ८ किमी अंतरावर असून तो मध्यप्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून दिल्ली, मुम्बई, पुणे, कोलकाता इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा आहे. इंदूर रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून इंदूर दुरंतो एक्सप्रेस, माळवा एक्सप्रेस, अवंतिका एक्सप्रेस, इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.
मुंबई ते आग्र्यादरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ३, अहमदाबाद ते इंदूरदरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ५९ व बैतुल ते इंदूरदरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ५९ ए हे राष्ट्रीय महामार्ग इंदूरमधून जातात. इंदूरमध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे.
इंदूरमध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा असे तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्यातून उन्हाळा सुरू होतो. कधी कधी तापमान ४८ अंश सेल्सियस पर्यंत जाते. तर पावसाळा जुलै ते सप्टेंबरपर्यंत असतो. जुलै ते सप्टेंबरमध्ये दक्षिण पूर्व मान्सूनमध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच एवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबरपर्यंत असतो.
इंदूर मध्यप्रदेशमधील सर्वात जास्त लोकसंख्याचे शहर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्मार्ट सिटी' मिशनमध्ये ज्या १०० भारतीय शहरांना निवडले आहे, त्यांत इंदूरची निवड झाली आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.